केंद्रावर दागिने अडकल्याने व्यवसाय प्रभावित

नागपूर : हॉलमर्किंगच्या नव्या नियमांची अंमलबजावणी होताच सराफा व्यापाऱ्यांनी त्यास विरोध केला. मात्र आता हॉलमार्किंग केंद्रानेही हॉलमार्किंगला विरोध सुरू केला आहे. या नव्या प्रणालीने केंद्रावर वाढलेला ताण आणि कामाच्या तुलनेत मानधन कमी मिळत असल्यामुळे मंगळवारी शहरातील सर्व हॉलमार्किंग केंद्रांनी एक दिवसाचा संप पुकारला. परिणामी सराफा व्यापाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यांचा एक दिवसाचा व्यवसाय त्यामुळे प्रभावित झाला.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

हॉलमार्किंगच्या नव्या हॉलमार्किंग युनिक आडेंटिटी क्रमांकामुळे शहरासह विदर्भातील सर्व व्यापाऱ्यांनी त्याला विरोध केला. यामुळे दागिन्यांच्या खरेदी-विक्रीची प्रक्रिया किचकट झाली आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक दागिन्यावर तीन वेळा हॉलमार्किंग करणे अनिवार्य झाल्याने दागिना हॉलमार्किंग केंद्रावर गेल्यास परत मिळवण्यासाठी एक आठवडा प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे ग्राहकांची नाराजी सराफा व्यापाऱ्यांना सहन करावी लागत आहे. असे चित्र सर्वत्र आहे. 

त्यातच हॉलमार्किंग केंद्रावरील कर्मचाऱ्यांचाही कामाचा वाढलेला ताण आणि  तुलनेत मानधन कमी मिळत असल्याने या केंद्रांनी मंगळवारी एक दिवसाचा संप पुकारला होता. या संपामुळे सराफा व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले नसले तरी त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. हॉलमार्किंगसाठी गेलेले सर्व दागिने मंगळवारी मिळणार होते ते सर्व केंद्रांवर अडकून पडले. परिणामी ग्राहकांनी आपली नाराजी सराफा व्यापाऱ्यांकडे व्यक्त केली.

हालमार्किंग केंद्राने मंगळवारी एक दिवसाचा संप पुकारल्याने सराफा व्यापाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. संपमुळे ग्राहकांचे दागिने वेळेत देता आले नसल्याने काही प्रमाणात व्यवसाय प्रभावित झाला.

– पुरुषोत्तम कावळे, अध्यक्ष महाराष्ट्र सुवर्णकार समाज