Businessman dies of heart attack while playing garba in buldhana | Loksatta

गरबा खेळताना मृत्यूने गाठले; व्यावसायिकाचा हृदयघाताने मृत्यू

गरबा खेळताना अचनाक भोवळ आली. मात्र, रुग्णालयात नेण्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला.

गरबा खेळताना मृत्यूने गाठले; व्यावसायिकाचा हृदयघाताने मृत्यू

नवरात्रीनिमित्त गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे रविवारी रात्री उशिरा घडली. विशाल पडधारिया ( ४७) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे.

हेही वाचा- नागपूर : ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच समपुदेशकाची नियुक्ती’

वीर सावरकर चौकातील नवदुर्गा मंडळाच्या प्रांगणात गरबा खेळताना त्यांना अचानक भोवळ आली. इतर भाविकांनी त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बाबू भैय्या या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पडधारिया यांनी २५ वर्षापूर्वी जानेफळ नगरीत गरबा, दांडिया संस्कृती रुजवत अनेकांना गरबा खेळण्याचे धडे दिले. गरबा खेळतानाच त्यांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. आज, सोमवारी व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून शोक व्यक्त केला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पत्नीला प्रसुतीसाठी रुग्णालयात आणणाऱ्या मूकबधिर युवकाची तेथील मूकबधिर परिचारिकेशी ओळख झाली, अन्…

संबंधित बातम्या

“शिवरायांचा जन्म कोकणात’ प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे काम बाकी, तरी उदघाटनाचा घाट; मात्र तरीही समृद्धीवरून थेट प्रवास
समृध्दी महामार्गाच्या पाहणी दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे स्टिअरिंग उपमुख्यमंत्र्यांच्या हाती
“हे फक्त गडकरीच करू शकतात, तो काँग्रेसचा नेता असूनही…”, नाना पाटेकरांचं नागपुरात वक्तव्य
बसमधील बेवारस सामानाची जबाबदारी वाहक व चालकाची!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: सिंहगड रस्ता भागात मोबाइल चोरट्यांची टोळी गजाआड
पुणे: मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मटार, फ्लाॅवर, कोबी, वांगी, मिरची स्वस्त
मुंबई: चंदनवाडी स्मशानभूमीतही लवकरच गॅस दाहिनी
IND vs BAN 1st ODI: रोहित-विराटला बाद करत शाकिबने केला मोठा पराक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा बांगलादेशचा पहिलाच गोलंदाज
चिंचवडमध्ये सराईत गुन्हेगाराचा खून; १८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल