नागपूर : शासनाने राज्यातील कॅब चालकांसाठी मराठी सक्तीची केली होती. शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री प्रताप सरनाईक यांच्या परिवहन विभागाने हा निर्णय घेतला होता. परंतु याला इतर राज्यातील विशेषत: हिंदी भाषिक कॅब चालकांकडून विरोध करण्यात आला. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे कॅब चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आणखी एक वर्ष मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयावर विरोधकांकडून टीका होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे फडणवीसांवर टीका केली आहे. यामुळे त्यांना मराठी भाषेचे प्रेम किती आहे, हे दिसून आल्याचे ते म्हणाले.
उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांसाठी मुदतवाढ
चार महिन्यांनी उत्तर प्रदेशाची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक लक्षात घेता या निर्णयाला मुदतवाढ देण्यात आल्याची टीका ठाकरे यांनी केली. ते म्हणाले की, दहा- पंधरा वर्षांची मुदत द्या. तुमची मराठी भाषेबाबत किती आपुलकी आहे, ती कळली. कुठेतरी एक भूमिकेवर रहायला पाहिजे. परंतु त्यांचे लक्ष निवडणुकीकडे आहे. यूपीची सत्ता त्यांच्याकडून जात आहे. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला. मला ही मुदतवाढ नाही आवडली.
किती वाक्ये शिकावी लागतात. डावीकडे जायचे, उजवीकडे जायचे, ओटीपी काय आहे. हे साधे वाक्य शिकायला एक वर्ष लागते का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सत्ताधारी पक्षात अंतर्गत वाद असल्याचे ते म्हणाले.
त्रास देणारे मार खातील
मराठी शिकणार ही त्यांची मग्रुरी आहे. मराठी आपली भाषा आहे. मुख्यमंत्री गुजरात, पंजाबला जावून आले. त्यांना आपल्या भाषेची आपुलकी नाही. त्यामुळेच त्यांनी मुदतवाढ दिली. हिंदी भाषिक लोकांना मराठी भाषा शिकायची नाही. मग्रुरी पणे बोलताहेत की आम्ही हिंदी शिकणार नाही. त्यांनी मराठी आत्मसाद करायला पाहिते. मराठी बोलायला पाहिजे. ते मराठी बालले नाही, वाईट शब्दात मराठी माणसाशी बोलसे तर मार खातील, असे ठाकरे म्हणाले.
राहुल गांधींच्या कार्यक्रमाचे कौतूक
पुणे येेथे झालेल्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाचे अमित ठाकरे यांनी कौतूक केले. असे राहुल गांधी निवडणुकीत दिसले असते तर आम्ही त्यांच्या सोबत गेलो असतो. राहुल गांधींसोबत पुढे जाणार का ही पक्ष प्रमुख राजसाहेब ठरवतील, असे ते म्हणाले. पक्ष प्रमुखांनी सूचना केल्यास ५ तारखेला दिल्लीत जाणार असे म्हणाले.
आता जेनझीची आठवण झाली
दिल्लीतील आंदोलनाने तुरुण जेनझीने आपली ताकद दाखवली. त्यामुळे आता भाजप जेनझीची गोष्ट करीत आहे. परंतु दिल्लीतील आंदोलनाच्या वेळी कुणीच आले नाही. विद्यार्थ्यांना मारले, त्यावर त्यावर बोलायची इच्छा झाली नाही. मी आकांशाच्या घरी गेलो. तीचे घर मुख्यमंत्र्यांच्या घरापासून ५०० मीटर आमदार परिणय फुके यांच्या घरापासून १०० मीटर आहे. परंतु ते भेटायला गेले नाही. वरिष्ठांनी या तरुणांना न भेटण्याचा सूचना केल्या आहे. आमदारांना खरेदी करण्यासाठी २५,३० कोटी असते. पंरतु पीडितांना देण्यासाठी १ कोटी रुपये नसल्याची टीका त्यांनी केली.
