scorecardresearch

पाहुणा म्हणून आला अन् दागिने चोरून गेला; नागपुरातील महिलेसोबत घडला विचित्र प्रकार

नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र प्रकार घडला आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र प्रकार घडला आहे. घरी आयोजित केलेल्या पार्टीसाठी आलेल्या एका पाहुण्याने फिर्यादीच्या घरातून दोन लाखांचे दागिने चोरून पळ काढला आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा धक्कादायक प्रकार हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना सुभेदार ले आऊट परिसरात घडली आहे.

प्रतिभा गणेश वानखेडे (६७) असं फिर्यादी महिलेचं नाव असून त्या भिसी चालवितात. एका सदस्याला भिसी लागल्याने १६ मे रोजी सायंकाळी वानखेडे यांनी त्यांच्या घरी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला भिसीत सहभागी असलेल्या सर्व सदस्यांना बोलवण्यात आले होते. तत्पूर्वी वानखेडे यांनी आपले सोन्याचे दागिने काढून एका रूमालात बांधले आणि सर्व दागिने कपाटात ठेवले.

दरम्यान, कुणीतरी २ लाख १२ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी हा धक्कादायक प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी पार्टीला आलेल्या सदस्यांना याबाबत विचारणा केली. परंतु कुणीही चोरी केल्याची कबुली दिली नाही. अखेर काल त्यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता त्या पाहुण्यांपैकी दागिने चोर कोण? याचा तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Came as guest and stole golden ornaments fir lodged crime in nagpur rmm

ताज्या बातम्या