चंद्रपूर : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी २४२ कोटी ९० लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे थकबाकीदारांविरोधात वसुली व वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम जोरात राबवण्यात येत आहे.

चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर गडचिरोली जिल्हा एकत्रित चालू वर्षातील व मागील वर्षाच्या एकंदरीत मागणीपैकी घरगुती ग्राहकांकडून १३ कोटी ६८ लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडून ४ कोटी १२ लाख येणे आहे, औद्योगिक ग्राहकांकडून ६ कोटी ६३ लाख थकबाकी वसुली येणे आहे, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून ३ कोटी ४३ लाख, तर ग्रामीण व शहरी पथदिवे यांच्याकडून २०८ कोटी ३१ लाख येणे आहेत. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांविरोधात सातत्याने वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू आहे. महावितरणची आर्थिक स्थिती समजून घेऊन ग्राहकांनी थकबाकी भरून महावितरण या आपल्याच कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत.

nashik, 14 Malnourished Children, Found in Trimbakeshwar Taluka, Treatment Malnourished Children , malnutrition in Trimbakeshwar Taluka, malnutrition in nashik, nashik news, Trimbakeshwar news,
त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४ कुपोषित बालके, ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्याचे आदेश
Thane, Water Supply Disruption, Uthalsar and Naupada Areas, thane news, thane water cut, naupada water cut, uthalsar water cut, Thane Water Supply Disruption, water news, thane news, marathi news,
ठाणे : उथळसर, नौपाड्यातील काही भागात सोमवारी पाणी नाही
supreme court
‘डीजेबी’ला निधी जारी करण्याचे निर्देश
Gutkha worth 21 lakh seized at different places in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी २१ लाखाचा गुटखा जप्त

चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण थकबाकी – १२८ कोटी ९६ लाख

ग्राहकांची वर्गवारी :

घरगुती – ९ कोटी ४२ लाख, वाणिज्य – ३ कोटी ६६ लाख, औद्योगिक – ५ कोटी ३८ लाख, पथदिवे – १०५ कोटी ४३ लाख, पाणीपुरवठा योजना – ३ कोटी १२ इतर व सरकारी कार्यालये – १ कोटी ९४ लाख, अशी एकूण- १२८ कोटी ९६ लाख.

गडचिरोली जिल्ह्यातील एकूण थकबाकी – ११३ कोटी ९४ लाख

ग्राहकांची वर्गवारी :

घरगुती – ४ कोटी २५ लाख, वाणिज्य – ४६ लाख, औद्योगिक – १ कोटी ३६ लाख, पथदिवे – १०२ कोटी ४७ लाख, पाणीपुरवठा योजना – ३० लाख, इतर व सरकारी कार्यालये – ४ कोटी ६९ लाख, अशी एकूण- ११३ कोटी ९४ लाख.