लोकसत्ता टीम

चंद्रपूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील अधिष्ठाता यांना खासदार हेमंत पाटील यांनी महाविद्यालयातील प्रसाधनगृह स्वच्छ करायला लावल्याने राज्यातील डॉक्टर संतापले आहे. चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी बुधवारी सायंकाळी मुख्य मार्गाने कॅन्डल मोर्चा काढत काळी फित लावून खा. पाटील यांचा निषेध नोंदविला.

आणखी वाचा-कुख्यात बुकी सोंटू जैन पळाला की त्याला पळवले? नागपूर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

नांदेड शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यूच्या तांडवानंतर खासदार हेमंत पाटील यांनी डिन एस. आर. वाकोडे यांना स्वच्छतागृह स्वच्छ करायला लावले, यावेळी पाटील यांच्या कार्यकत्यांनी व्हिडीओ बनवीत व्हायरल सुद्धा केला. या घटनेमुळे डॉक्टर संघटनांनी खासदार पाटील विरोधात आक्रमक झाल्या आहेत. चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या वतीने काळी फित लावत कॅन्डल मार्च काढून निषेध नोंदवला. खासदार पाटील यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी डॉक्टरांनी केली. यावेळी संघटनेच्या अध्यक्ष डॉ. तेजस्विनी चौधरी, रोहित होरे, प्रशांत मगदूम, ऋतुजा गांगुर्डे, रोहीत नायकवाडे यांच्यासह मोठ्या संख्येने डॉक्टरांची उपस्थिती होती.