अकोला : घराच्या अंगणात चक्क अंमली पदार्थ असलेल्या  गांजाची झाडे लावल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील पातूर येथे समोर आला. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केली. गांजाची १५ झाडे जप्त करण्यात आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ‘सफारी’ला सुरुवात; पहिल्याच दिवशी पर्यटकांची गर्दी

हेही वाचा >>> वर्धा : गाडगेबाबांची ‘दशसूत्री’ दोन दिवसांत पुन्हा झळकणार मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर

पाेलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या विशेष पथकाला पातूर येथील भीम नगर परिसरात राहणारा शेख कय्यूम शेख करीम (४४) याने आपल्या घरात गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. आरोपी या झाडांची देखभाल करून ग्रहकांना गांजाची विक्री करीत होता. विशेष पोलीस पथकाने त्याच्या घरामध्ये छापा टाकला. घराच्या मागील बाजूच्या अंगणात १३ फूट उंचीची १५ झाडे लावल्याचे आढळून आले. त्याचे वजन २२ किलो असून एक लाख पाच हजाराची किंमत आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूद्ध पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई विशेष पोलीस पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cannabis plants planted house area shocking news from patur akola district ysh
First published on: 02-10-2022 at 11:28 IST