बुलढाणा : जिल्हा काँग्रेसतर्फे शुक्रवारी केंद्र आणि राज्य सरकारच्या भोंगळ कारभाराविरुध्द जिल्हा काँग्रेसच्या वतीने बुलढाणा शहरात चिखलफेक आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलन प्रकरणी पोलिसांनी जिल्हाध्यक्ष यांच्यासह एकूण सत्तावीस पदाधिकारी विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस जमादार उमेश भास्कर घुबे (वय ३७) यांनी यासंदर्भात बुलढाणा पोलिसांकडे तक्रार केली. यावरून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सत्तावीस पदाधिकारी विरोधात मुंबई पोलीस कायद्याच्या कलम एकशे पस्तीस नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये चिखली विधानसभेचे माजी आमदार तथा जिल्हा अध्यक्ष राहुल बोद्रे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड , ज्येष्ठ नेते लक्ष्मण घुमरे , प्राध्यापक संतोष आंबेकर , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश रामभाउ अवचार, संजय पाढरे , अनुसूचित जाती आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद बंडवाल, एनएसयुआय चे जिल्हा अध्यक्ष शैलेश खेडेकर , प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे , शैलेश सावजी , अब्दुल जहीर अब्दुल जब्वार, जिल्हा सरचिटणीस सतीश मेहेंद्रे यांचा समावेश आहे त्यांच्यासह इतर पंधरा कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त यांचा समावेश आहे.

हेही वाचा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पोलिसाने केली आत्महत्या

मागील २१ जून रोजी बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथे दुपारी प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार हे आंदोलन करण्यात आले होते. केंद्र आणि राज्य सरकारची मनमानी, हुकूमशाही, त्यांच्या काळातील गैरव्यवहार, घोटाळे, नीट व अन्य प्रवेश परीक्षा मधील घोळ यासंदर्भात हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी सरकार विरोधी घोषणा करण्यात आल्या होत्या. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चिखलफेक केली. तसेच जोडे मारून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन देखील करण्यात आले.

हेही वाचा : विदर्भात रेल्वे डब्बे निर्मिती प्रकल्पांसह अधिक रेल्वे सुविधांचा प्रस्ताव

‘ही’ आहेत कारणे

दरम्यान या प्रकरणी पोलीस जमादार उमेश घुबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल अधिकारी पोलीस हवालदार रामकला सुरभे गुन्हे दाखलची कारवाई केली. बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश बाजड हे घटनेचा तपास करीत आहे. यातील आरोपी पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे आदेशनुसार बुलडाणा जिल्हया मध्ये लागू मुंबई पोलीस कायदा सन १९५१ चे कलम सदोतीस (१) आणि (३) आवेशाचे उल्लंघन केले. सदर आंदोलनाकरीता कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता एकत्र येत आंदोलन केल्याचे तक्रारीत नमूद आहे.