भारतातील १४ व्याघ्रप्रकल्पांना ‘कॅट्स’ची मान्यता

महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पाचा समावेश

महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पाचा समावेश

नागपूर : भारतातील १४ व्याघ्रप्रकल्पांना कॅट्स (कन्झर्वेशन अश्युअर्ड टायगर स्टँडर्ड)ची मान्यता मिळाली असून यात महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पाचा समावेश आहे. जागतिक व्याघ्र दिनी महाराष्ट्राला ही सुखद भेट मिळाली आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आणि व्याघ्र संवर्धनाच्या लक्ष्याचे मूल्यांकन करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून ही प्रक्रिया वापरली जाते.

कॅ ट्स हे जागतिक पातळीवर स्वीकारले जाणारे संवर्धनाचे मानक आहे. भारतात कॅ ट्सच्या मूल्यांकनासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला ग्लोबल टायगर फोरम आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया सहकार्य करतात. ‘कॅ ट्स-लॉग’ या सॉफ्टवेअरचा वापर करून दृश्य आणि क्षेत्रावर आधारित व्याघ्रसंवर्धनाचा मागोवा घेण्यात आला. या सॉफ्टवेअरचा वापर करून पहिल्यांदा क्षेत्रीय मूल्यांकन करण्यात आले. जागतिक पातळीवर ही प्रक्रि या रूढ करणारा भारत हा पहिला देश ठरला. वाघांच्या  लोकसंख्येला आधार देणारा अधिवास हा व्याघ्रसंवर्धनातील मुख्य घटक आहे. वाघांच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी त्याचे प्रभावी व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. वाघांचा अधिवास असणाऱ्या सात देशात ही मूल्यांकनाची प्रक्रि या सुरू असून त्यातील सर्वाधिक क्षेत्र भारतात आहे. यावर्षी २० व्याघ्रप्रकल्पात मूल्यांकन करण्यात आले असून त्यातील १४ व्याघ्रप्रकल्पांना कॅ ट्सची मान्यता देण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पाचा समावेश आहे.

व्याघ्रप्रकल्पाचे महत्त्व आणि स्थिती, व्यवस्थापन, समुदाय, पर्यटन, संरक्षण, अधिवास, वाघांची संख्या या घटकांमध्ये या व्याघ्रप्रकल्पांना ७० टक्केपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. या मूल्यांकनासाठी राष्ट्रीय व्याघ संवर्धन प्राधिकरणाला ग्लोबल टायगर फोरम आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया सहकार्य करतात.

कॅट्सची मान्यता मिळालेले व्याघ्रप्रकल्प

पेंच व्याघ्रपकल्प (महाराष्ट्र)

अचानकमार व्याघ्रपकल्प (छत्तीसगड)

बंदीपूर व्याघ्रपकल्प (कर्नाटक)

दुधवा व्याघ्रपकल्प (उत्तर प्रदेश)

कान्हा व्याघ्रपकल्प (मध्यप्रदेश)

काझीरंगा व्याघ्रपकल्प (आसाम)

मानस व्याघ्रपकल्प (आसाम)

मदूमलाई व्याघ्रपकल्प (तामिळनाडू)

ओरंग व्याघ्रपकल्प (आसाम)

पारंबीकु लम व्याघ्रपकल्प (के रळ)

पन्ना व्याघ्रपकल्प (मध्यप्रदेश)

सातपुडा व्याघ्रपकल्प (मध्यप्रदेश)

सुंदरबन व्याघ्रपकल्प (प. बंगाल)

वाल्मीकी व्याघ्रपकल्प (बिहार)

भारतातील १४ व्याघ्रप्रकल्पांना कॅ ट्सची मान्यता मिळणे म्हणजे  वाघांच्या व्यवस्थापनात उत्कृ ष्टता प्राप्त करणे होय. आंतरराष्ट्रीय सामान्य निकषानुसार व्यवस्थापन पद्धतीला यामुळे बळकटी मिळेल. डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया यासाठी नेहमीच मूल्यांकन प्रक्रि येस सहकार्य करत राहील.

रवी सिंग, सरचिटणीस व मुख्य कार्यकारी अधिकारी, डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडिया.

कॅट्सची मान्यता ही  जागतिक मान्यता आहे. हवामानातील बदलांशी जुळवून घेणे, परिसंस्थेचा टिकाऊपणा, प्राण्यांमुळे माणसाला आणि माणसांपासून प्राण्याला होणाऱ्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठीसुद्धा ही मान्यता महत्त्वाची ठरते.

– राजेश गोपाल, ग्लोबल टायगर फोरम.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cats approves 14 tiger projects in india zws