scorecardresearch

सीबीआयने ‘वेकोलि’च्या अधिकाऱ्याला एक लाखाची लाच घेताना केली अटक

गौतम बसुतकर, असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून, त्याला न्यायालयाने ८ फेब्रुवारीपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

western coalfields limited official bribe
सीबीआयने 'वेकोलि'च्या अधिकाऱ्याला एक लाखाची लाच घेताना केली अटक (प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड (वेकोलि) कंपनीच्या एका अधिकाऱ्याला एक लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने अटक केली. गौतम बसुतकर, असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून, त्याला न्यायालयाने ८ फेब्रुवारीपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. गौतम बसुतकर हा यवतमाळ जिल्ह्यातील वणीजवळील घोंसा ओपन कास्ट माईन येथे उपक्षेत्र व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे.

हेही वाचा – नागपूर: मेयोत त्वचारोग विभागाचा वार्ड दाखवण्याची बनवाबनवी उघड; संतप्त परिचारिकांद्वारे काम बंद

हेही वाचा – नागपूर: भारतातील ५ हजार परिचारिकांना इंग्लंडमध्ये संधी- मेहता

तक्रारदाराला वणी येथील खाणीतून कोळसा काढण्यासाठी मंजुरी आदेश हवा होता. त्यासाठी गौतम याने ३ लाख २३ हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, त्यांनी लाच देण्यास नकार दिला. त्यानंतर गौतम याने एक लाख रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. गौतम याला एक लाखाची लाच स्वीकारताना सीबीआयने अटक केली. त्याला न्यायालयाने ८ फेब्रुवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गौतम याच्या घरातून काही महत्त्वपूर्ण दस्तावेज ताब्यात घेतले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 10:09 IST

संबंधित बातम्या