लोकसत्ता टीम
नागपूर : सध्या राज्यभरात कॉन्व्हेंट शिक्षण पद्धतीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कॉन्व्हेंट संस्कृती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शहर आणि तालुक्यांच्या ठिकाणांसह मोठ्या गावांतही इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा सुरू झाल्या आहेत, कुठे होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांसाठी सुरू असलेल्या शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या प्रचंड रोडावली आहे. शिवाय, कमी पटसंख्येमुळे या शाळांही अडचणीत आल्या आहेत.

स्पर्धेचे युग असल्यामुळे प्रत्येकच पालक आपल्या पाल्यास चांगले शिक्षण मिळावे, या उद्देशाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवण्यासाठी आग्रही असतो. आर्थिक परिस्थिती नसतानाही पालकवर्ग मोठमोठ्या आणि प्रचंड फी असलेल्या शाळांमध्ये आपल्या पाल्याला शिकवतो. राज्यात कॉन्व्हेंट संस्कृती वाढत असतानाच ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमामुळे त्यात अधिकच भर पडली आहे. प्रत्येक पालकाचा आणि विद्यार्थ्याचा ओढा सीबीएसई अभ्यासक्रमाकडे असतो. भविष्यात उच्च शिक्षण घेण्यासाठी पाया मजबूत व्हावा, याकरिता सीबीएसई अभ्यासक्रम आवश्यक आहे, असा सर्वांचा समज.

states all primary schools closed on September 25
राज्यातील सर्व शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
New procedure regarding online booking by LPG Company to customers
आता ‘ओटीपी’ सांगितल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळणारच नाही; कशी आहे नवीन प्रक्रिया?
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”

हेही वाचा >>>नागपूर : मुलींसाठी आईवडिल चिंतित,अन् ती सापडली ….

स्टेट बोर्ड अर्थात राज्य शिक्षण मंडळांतर्गतच्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या घसरण्यासाठी अभ्यासक्रम हा मुख्य कारणीभूत घटक असल्याचा आरोप गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्येही सीबीएससी बोर्डाच्या धर्तीवर अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. त्यासाठी तिसरी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रमही निश्चित करण्यात आला आहे. तो पुढील शैक्षणिक वर्षापासून शिकविला जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच ही माहिती दिली.

आचारसंहितेपूर्वी मराठी भाषा भवनचे उद्घाटन

मरिन लाईन्स येथे मराठी भाषा विभागाकडून मराठी भाषा भवन उभारले जाणार आहे. या इमारतीचे भूमिपूजन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केले जाईल. नवी मुंबई येथे बांधण्यात येणार्‍या साहित्य भवनाचे भूमिपूजनही आचारसंहितेपूर्वी केले जाणार आहे. साहित्य भवनात साहित्यिकांना राहण्याच्या व्यवस्थेबरोबरच ग्रंथालय, साहित्य दालन, आदी सुविधा असतील, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>>नागपूर : देशातून दलालांची जात संपूर्णपणे नष्ट, उपराष्ट्रपती धनखड म्हणतात,‘सरकारी नोकऱ्या…’

मराठी भाषा विषय अनिवार्य

अकरावी आणि बारावीच्या वर्गांसाठी मराठी भाषा विषय अनिवार्य करण्यात आल्याचेही त्यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. राज्यात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबाबत आराखडा तयार करण्यात आला आहे. सीबीएसईच्या शाळांचे वेळापत्रक आणि सुट्ट्या वेगळ्या असतात. राज्य मंडळाच्या शाळांमध्ये त्याप्रमाणे बदल करण्याबाबत शिक्षक संघटनांशी चर्चा करणार आहे, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

अंगणवाडीसेविकांवर नवी जबाबदारी

राज्यातील अंगणवाडीसेविकांवर आता शिशुवर्गातील (बालवाटिका, बालवाटिका १-२) मुलांना शिकविण्याची जबाबदारी सोपवली जाणार आहे. राज्यात एकूण ४८ हजार अंगणवाड्या आहेत. त्यातील अंगणवाडीसेविकांना शालेय शिक्षण विभागाकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी लागणार्‍या पुस्तकांची छपाई महिला व बालविकास विभागाकडून केली जाणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.

परदेशात नोकरीसाठी व्यावसायिक शिक्षण

राज्यात व्यावसायिक शिक्षणही बंधनकारक केले असून, व्यावसायिक शिक्षणाबरोबरच एक परदेशी भाषाही शिकवली जाणार आहे. व्यावसायिक शिक्षण आणि परदेशी भाषेचे शिक्षण एकाच वेळी मिळणार असल्यामुळे परदेशात नोकरीसाठी जाण्याची इच्छा असलेल्या मुलांना याचा फायदा होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.