scorecardresearch

Premium

ऑक्टोबर महिन्यात खगोलीय घटनांची रेलचेल; आकाशप्रेमींसाठी पर्वणी…

ऑक्टोबर महिन्यात सूर्य व चंद्र अशी दोन ग्रहणे, दोन उल्का वर्षाव, ग्रहांच्या चंद्र व ताऱ्यांसोबत युती, ग्रहांचे उदयास्त आदींची रेलचेल राहणार आहे.

celestial events in the month of October
सध्या स्थितीत गुरु, शुक्र आणि शनि हे तीन महाग्रह आकाशात अतिशय विलोभनीय दर्शन देत आहेत.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता टीम

अकोला : मोसमी वारे परतीला लागल्यानंतर आकाश निरीक्षण करणे अधिक सोयीचे होत असते. ऑक्टोबर महिन्यात सूर्य व चंद्र अशी दोन ग्रहणे, दोन उल्का वर्षाव, ग्रहांच्या चंद्र व ताऱ्यांसोबत युती, ग्रहांचे उदयास्त आदींची रेलचेल राहणार आहे. आकाश प्रेमींनी या अनोख्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले.

Fiscal deficit
वित्तीय तूट ऑगस्टअखेर ६.४३ लाख कोटींवर; पहिल्या पाच महिन्यांत वार्षिक अंदाजाच्या ३६ टक्क्यांवर
Pitru Paksha In Amrut Sarvarth Siddhi Yog After 30 Years These Five Zodiac Signs To Be Wealthy Rich By Ancestors Money Astro
३० वर्षांनी पितृपक्षात अमृत व सर्वार्थ सिद्धी योग बनल्याने ‘या’ ५ राशींना लाभणार वाडवडिलांची कृपा; होऊ शकता श्रीमंत
Surya Grahan and Chandra Grahan
Grahan 2023: ऑक्टोबर महिन्यामध्ये लागणार दोन ग्रहण! जाणून घ्या तिथी, वेळ आणि सुतककाळ
Suryagrahan 2023 the last solar eclipse of the year will create chaos in the lives of these 4 zodiac signs
Suryagrahan 2023 : वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण; ‘या’ चार राशींच्या लोकांच्या आयुष्यात होणार मोठे बदल

सध्या स्थितीत गुरु, शुक्र आणि शनि हे तीन महाग्रह आकाशात अतिशय विलोभनीय दर्शन देत आहेत. महिन्याच्या प्रारंभी बुध कन्या राशीत व शूक्र सिंह राशीत प्रवेश झाला. ३ ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रहाचा पश्चिमेस अस्त, ६ ऑक्टोला रात्री ७ वा. अवकाष केंद्र दर्शन, ७ ला.बुध ग्रहाचा पूर्वेकडे अस्त होत आहे. ७, ८ व ९ रोजी रात्री ‘ड्रेक्रोनिड’ तारका समूहातून आणि २१, २२ रोजी मृग नक्षत्र समुहातून दरताशी वीस एवढ्या उल्का पडताना दिसतील. १४ ला कंकणाकृती सूर्य ग्रहण आहे. मात्र, भारतात ते दिसणार नाही. २८ रोजी मध्यरात्री नंतर होणारे खंडग्रास चंद्रग्रहण सुमारे सव्वा तास बघता येईल, असे प्रभाकर दोड म्हणाले.

आणखी वाचा-इंग्रजी गाणे वाजवल्याने मनसे पदाधिकारी संतापले; “मराठी गाणे वाजवले नाही तर…”

सध्या अगदी रात्रीच्या प्रारंभी सूर्यमालेतील सर्वात सुंदर आणि वलयांकित ग्रह शनी हा रात्रीच्या प्रारंभी ते पहाटे पर्यंत पूर्वेकडून पश्चिमेकडे दर्शन देत आहे. शनी ग्रह सध्या कुंभ राशी समूहात आहे. त्यानंतर रात्री ८.३० नंतर पूर्व क्षितिजावरच सूर्यमालेतील सर्वात मोठा असलेला गुरु ग्रह हा आपल्याला अगदी ठळकपणे पहाटेपर्यंत पाहता येईल. त्यानंतर पहाटेच्या निवांत वेळी पूर्व क्षितिजावर अधिराज्य गाजवणारा शुक्र ग्रह चांगल्यापैकी पाहता येईल. या तिन्ही ग्रहांचे दुर्बिणीतून दर्शन केल्यास शनी ग्रहाचे सुंदर वलय आणि गुरु ग्रहाचे चार चंद्र चांगल्यापैकी पाहता येतील. पहाटेच्या वेळी शुक्र ग्रहाच्या चंद्रासारख्या कला बघता येतील, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.

पाच ग्रह, हजारो ताऱ्यांचे सहज दर्शन

अवकाशातील आकर्षक नजारे पाहण्यासाठी महागड्या दुर्बिणींची गरज असते, असा बहुतांश लोकांचा गैरसमज आहे. पृथ्वीवरून आपण पाच ग्रह, पाऊणेपाच हजार तारे आणि ८८ तारका समूह साध्या डोळ्यांनी सहज पाहू शकतो, असे प्रभाकर दोड यांनी नमूद केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Celestial events in the month of october good chance for sky lovers ppd 88 mrj

First published on: 02-10-2023 at 14:25 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×