scorecardresearch

नागपूर: ‘ती’ चित्रफीत अर्धवट, जागा वाटपाबाबत काहीच ठरले नाही! चंद्रशेखर बावनकुळे यांची सारवासारव

जागा वाटपाबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नसून केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व त्याबाबत निर्णय घेणार आहे

chandrashekhar bawankule
(फोटो सौजन्य- संग्रहित छायाचित्र, लोकसत्ता)

लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर: जागा वाटपाबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नसून केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व त्याबाबत निर्णय घेणार आहे. मात्र जी चित्रफीत दाखविली जात आहे त्यात अर्धाच भाग दाखवण्यात आला आहे. शिवसेना आणि भाजप मिळून २८८ जागा लढणार असून त्यात एनडीएच्या सर्व घटक पक्षाचा समावेश राहणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. शिवसेना भाजप आणि एनडीएतील सर्व घटक पक्ष मिळून २८८ मतदार संघात भारतीय जनता पक्ष प्रचंड काम करत आहे. भारतीय जनता पक्ष जेवढी तयारी करेल तेवढी ती शिवसेनेच्या कामात येईल आणि शिवसेना जेवढी तयारी करेल ती भाजपच्या कामी येणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही आमदार व पदाधिकारी लवकरत शिंदे गटात प्रवेश करतील असेही बावनकुळे म्हणाले.

आणखी वाचा- शिंदेबाबत आजी-माजी प्रदेशाध्यक्षांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून भाजपची सारवासारव

….तेव्हा पटोले का बोलत नाहीत?

प्रत्येक जण आपल्या श्रद्धेनुरूप आपल्या देवाची पूजा करतात. काही ठिकाणी तर जहरी कार्यक्रम होतात. तिथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले का बोलत नाही? हिंदू विचारांनाच का विरोध करतात? काही गोष्टी चुकीच्या असतील तर दुरुस्त करता येतील पण कार्यक्रमच होणार नाही म्हणजे ही काय मोगलशाही आहे का, असा प्रश्न उपस्थित करत मुंबईतील धिरेंद्र महाराजांच्या कार्यक्रमाला भाजप समर्थन देईल असेही बावनकुळे म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 17:09 IST