चंद्रशेखर बोबडे,लोकसत्ता

नागपूर : केंद्र सरकारने आठ वर्षापूर्वी नागपूरसाठी घोषित केलेल्या व अद्याप प्रलंबित असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च इन्सिट्यूट अर्थात ‘नायपर’ (एनआयपीईआर) बाबत नुकत्यात झालेल्या संसदेच्या अधिवेशनात याबाबत केंद्राने काहीच तपशील न दिल्याने इन्स्टिट्यूट नागपूरला होण्याबाबत पुन्हा एकदा अनिश्चितता निर्माण झाली आहे. २०१४ मध्ये केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यावर नागपूररमध्ये नायपर सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती.

हेही वाचा >>> काँग्रेसच्या व्यासपीठावर कलावती, अमित शाहाला सुनावले, म्हणाल्या …

२०१५ मध्ये राज्यातही भाजपचे सरकार आले. ते्व्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरातच ही राष्ट्रीय संस्था येणार असल्याने त्यांनीही यासाठी प्रयत्न केले. जागेबाबत चर्चा झाली. मात्र अद्याप काही इन्सिट्युटला मुहूर्त मिळाला नाही.नुकत्याच झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शिंदे गटाचे विदर्भातील खासदार भावना गवळी व कृपाल तुमाने यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्रातील नायपरबाबत तपशील सादर करण्याची विनंती केली होती. यावर केद्राच्या रसायने आणि खते मंत्रालयाच्या फार्मास्युटिकल्स विभागाने संपूर्ण देशभरातील संस्थांबाबत माहिती दिली. पण मात्र, त्यात महाराष्ट्राबाबत उल्लेख नाही. त्यामुळे महाराष्ट्रात नागपुरात सुरू होणाऱ्या या संस्थेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. राज्यात शिंदे -भाजप युतीचे सरकार आहे. मात्र् शिंदे गटाच्या खासदाराने विचारलेल्या प्रश्नावर केंद्राची कोंडी झाली आहे.

Story img Loader