अकोला : मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई-नागपूर, बनारस, गोरखपूर, समस्तीपूर, दानापूर तसेच पुणे-नागपूर, दानापूर दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष गाडीच्या १० सेवा होणार आहेत. ट्रेन क्रमांक ०२१४१ द्वि-साप्ताहिक विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर रविवार व मंगळवारी २२.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान ००.२० वा. सुटेल व नागपूर येथे त्याच दिवशी १५.१० वा. पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०२१४२ नागपूर येथून दर रविवार व मंगळवारी २०.०० वा. सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.३० वा. पोहोचेल.
या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव व वर्धा येथे थांबा राहील. पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष चार सेवा होतील. गाडी क्रमांक ०१४६९ साप्ताहिक विशेष दिनांक २४.०२.२०२६ व ०३.०३.२०२६ रोजी पुणे येथून दर मंगळवारी १५.५० वाजता सुटेल व नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१४७० साप्ताहिक विशेष दिनांक २५.०२.२०२६ व ०४.०३.२०२६ रोजी नागपूर येथून दर बुधवारी ०८.०० वाजता सुटेल व त्याच दिवशी २३.३० वाजता पुणे येथे पोहोचेल. थांबे उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे राहील.
पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक विशेषच्या चार सेवा होतील. ट्रेन क्रमांक ०१४५७ साप्ताहिक विशेष दिनांक २५.०२.२०२६ व ०४.०३.२०२६ रोजी पुणे येथून दर बुधवारी १५.५० वा. सुटेल व नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वा. पोहोचेल. ट्रेन क्रमांक ़१४५८ साप्ताहिक विशेष दिनांक २६.०२.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी नागपूर येथून दर गुरुवारी ०८.०० वा. सुटेल व पुणे येथे त्याच दिवशी २३.३० वा. पोहोचेल.
या विशेष गाड्यांचे आरक्षण १८.०२.२०२६ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच संकेतस्थळावर आगाऊ आरक्षण कालावधी अंतर्गत उपलब्ध होईल. आगाऊ आरक्षण कालावधी नंतरच्या प्रवासासाठी आरक्षण संबंधित पुढील तारखेनुसार उपलब्ध होईल. अनारक्षित डब्यांसाठी सामान्य शुल्कासह यूटीएस प्रणालीद्वारे आरक्षण करता येईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे.
