अमरावती : मध्य रेल्वेने परिचालकीय कारणास्तव आणि प्रवासी सुविधेच्या दृष्टीने काही महत्वाच्या मेल / एक्सप्रेस गाड्यांच्या टर्मिनलमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकातही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. क्रमांक १२१११ सीएसएमटी मुंबई- अमरावती एक्सप्रेस ही गाडी रात्री २०.०५ ऐवजी २०.५० वाजता सीएसएमटी मुंबई रेल्वेस्थानकावरून सुटणार आहे.

मुंबईहून सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

१४ एप्रिलपासून क्रमांक १२१११ सीएसएमटी-अमरावती ही एक्सप्रेस सीएसएमटीवरून रात्री २०.५० वाजता सुटेल. या गाडीच्या ठाणे (२१.१७), कल्याण (२१.४७) आणि इगतपुरी (२३.३०) या स्थानकांवरील वेळांतही बदल झाला आहे.

क्रमांक १२२८९ सीएसएमटी-नागपूर दुरांतो एक्सप्रेस ही प्रवाशांची आवडती गाडी आता रात्री १९.५५ ऐवजी २०.३५ वाजता सुटेल.

क्रमांक १७३१८ दादर-हुबळी एक्सप्रेस ही गाडी दादरवरून रात्री २०.१५ ऐवजी २०.०५ वाजता सुटेल. ठाणे (२०.२२) आणि पनवेल (२१.०८) या स्थानकांवरील वेळा बदलल्या आहेत.

क्रमांक ११३०१ सीएसएमटी-बंगळुरू एक्सप्रेस ही गाडी सकाळी ८.१० ऐवजी ७.५५ वाजता रवाना होईल.

मुंबईत येणाऱ्या गाड्यांच्या वेळात १३ आणि १६ एप्रिलपासून बदल करण्यात आला आहे. मुंबईत सकाळी पोहाचणाऱ्या काही गाड्यांच्या वेळा रेल्वेने ५ ते १५ मिनिटांनी बदलल्या आहेत. क्रमांक १२२९० नागपूर-सीएसएमटी दुरांतो ही गाडी सकाळी ८.०५ ऐवजी ८.०० वाजता पोहचेल. क्रमांक २२ १०८ लातूर-सीएसएमटी एक्सप्रेस ही गाडी सकाळी ७.५५ ऐवजी ८.०० वाजता पोहचेल. क्रमांक १२११६ सोलापूर-सीएसएमटी एक्सप्रेस ही गाडी ५ मिनिटे लवकर म्हणजे सकाळी ६.३० वाजता पोहचेल. क्रमांक २२१४४ बिदर-सीएसएमटी एक्सप्रेस ही गाडी १६ एप्रिलपासून सकाळी ७.५५ ऐवजी ८.०० वाजता मुंबईत येईल.

रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार गाडी क्रमांक २२१७७/२२१७८ सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्सप्रेसचे टर्मिनल आता बनारस येथे हलविण्यात आले आहे. क्रमांक २२१७७ सीएसएमटी-बनारस ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मध्यरात्री ००.१० ऐवजी आता ००.१५ वाजता सुटेल. ही गाडी वाराणसीऐवजी बनारस येथे पहाटे ३.४५ वाजता पोहचेल. २२१७८ बनारस-सीएसएमटी एक्सप्रेस परतीच्या प्रवासात ही गाडी वाराणसीऐवजी बनारस स्थानकावरून सकाळी  ९.४५ वाजता सुटेल आणि सकाळी ११.४० वाजता मुंबईत पोहचेल. पुर्वी ही गाडी वाराणसीहून सकाळी १०.०० वाजता सुटत होती.

प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर पोहचण्यापुर्वी अधिकृत ॲपच्या माध्यमातून सुधारित वेळांची खात्री करून घ्यावी, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.