नागपूर : प्रवाशांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबई–नागपूर/कोल्हापूर/सावंतवाडी रोड तसेच पुणे-नागपूर दरम्यान एकूण २४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी महिन्यात विविध तारखांना या गाड्या धावणार आहे.
गाडी क्र. ०१०२९ विशेष १३, १८ व २० फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून दुपारी २.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२० वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे पोहोचेल.
परतीची गाडी क्र. ०१०३० विशेष १४, १९ व २१ फेब्रुवारी २०२६ रोजी कोल्हापूर येथून दुपारी ३.५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता सीएसएमटी येथे येईल.ही गाडी दादर, ठाणे (फक्त ०१०३०), कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज येथे थांबेल. या गाडीला ४ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय व २ द्वितीय श्रेणी (गार्ड ब्रेक व्हॅनसह) डबे असतील.
गाडी क्र. ०११२९ विशेष १४, १९ व २१ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२.२० वाजता सीएसएमटी येथून सुटून त्याच दिवशी दुपारी १२.३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
ट्रेन क्र. ०११३० विशेष १४, १९ व २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.२० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता सीएसएमटी येथे येईल.
या गाडीचे थांबे दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे असतील. या गाडीला १ वातानुकूलित द्वितीय, ५ वातानुकूलित तृतीय, १० शयनयान, ४ सामान्य व २ द्वितीय श्रेणी (गार्ड ब्रेक व्हॅनसह) डबे असतील.
ट्रेन क्र. ०२१३९ सुपरफास्ट विशेष १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२.२० वाजता सीएसएमटी येथून सुटून दुपारी ३.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल.
ट्रेन क्र. ०२१४० विशेष १७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता नागपूर येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता सीएसएमटी येथे येईल.या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील. या गाडीला १ वातानुकूलित द्वितीय, ५ वातानुकूलित तृतीय, १० शयनयान, ४ सामान्य द्वितीय व १ द्वितीय श्रेणी (गार्ड ब्रेक व्हॅनसह) डबे असतील.
ट्रेन क्र. ०१०२१ सुपरफास्ट विशेष १४ व २१ फेब्रुवारी २०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून पहाटे १२.५५ वाजता सुटून दुपारी ३.४५ वाजता नागपूर येथे पोहोचेल.
ट्रेन क्र. ०१०२२ विशेष १४ व २१ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता नागपूर येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे येईल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील.

