नागपूर : वातावरणात सातत्याने होणारा बदलाचा परिणाम ऋतुंवर होत असून बाराही महिने अवकाळी पावसाने राज्यात ठाण मांडले आहे.हिवाळ्यात यावर्षी थंडी जाणवलीच नाही. तर पावसाळ्यात जितका पाऊस झाला नसेल, तितका अवकाळी पाऊस मात्र बाराही महिने पडत आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना फार मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

यंदा हिवाळ्यात थंडीपेक्षा पावसाच्या दिवसांमध्ये वाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला पावसाची हजेरी लागल्यानंतर आता महिना अखेरीस परत एकदा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उन्हाळ्यात तापणाऱ्या विदर्भाने हिवाळ‌यात थंडीचा निच्चांक देखील नोंदवला आहे. मात्र, अधूनमधून गारठा जाणवण्याव्यतिरिक्त हिवाळ्यातील थंडीची मजा घेता आली नाही. जानेवारीच्या अखेरच्या टप्प्यात गारठा जाणवल्यानंतर फेब्रुवारीतही किमान काही दिवस थंडी राहील, अशीच अपेक्षा होती.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
how does hail fall marathi news, how does hail fall in summer marathi news
विश्लेषण: गारांचा पाऊस कडक उन्हाळ्यात कसा पडतो? हिमवर्षाव आणि गारपिटीमध्ये काय फरक?
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
unseasonal rain in maharashtra
राज्यात सहा एप्रिलपासून अवकाळीचे संकट

हेही वाचा >>>छत्रपतींच्या मावळ्यांचा ‘दांडपट्टा’ राज्यशस्त्र म्हणून घोषित; सुधीर मुनगंटीवार यांची आग्रा किल्ल्यामधून घोषणा

मात्र, ती सपशेल खोटी ठरली. जानेवारीत तापमान नऊ अंशाच्या खाली गेले, पण त्यानंतर लगेच तापमान सामान्य झाले. आता तर कमाल तापमानासह किमान तापमानातही झपाट्याने वाढ होत आहे. आधूनमधून अवकाळी पावसाचे आगमन सुरूच आहे. दरम्यानच्या काळात सातत्याने चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण होते. तर याच काळात पाऊस डोकावून गेला. आतादेखील २५ व २६ फेब्रुवारी या कालावधीत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील अकोला बुलढाणा हे दोन्ही जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उपराजधानीत कमाल तापमानात मात्र सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. तर किमान तापमानही २० अंश सेल्सिअसच्या जवळ होते. कमाल तापमान हे सरासरीपेक्षा दीड तर किमान तापमान हे सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक आहे. मात्र प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, २२ ते २८ फेब्रुवारी या काळात तापमानात थोडीफार घसरण होण्याची शक्यता आहे.

सुमारे एक ते तीन अंशाने कमी होईल. किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या आसपास असताना १५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या अंदाजाने शेतकरी चिंतेत आहे. काही दिवसांपूर्वी विदर्भात बऱ्याच ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आता पुन्हा एकदा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने उरलेसुरले पीकदेखील हातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.