चंद्रपूर : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या एका निर्णयामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा रंगत निर्माण केली आहे. या निर्णयाचा परिणाम कालपर्यंत निवडणूक रिंगणाबाहेर असलेले वरोराचे डॉ. विजय देवतळे, गोंडपिंपरी येथील उल्हास करपे, राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर व कोरपनाचे विजय बावणे थेट निवडणूक रिंगणात आले आहेत.
तर बिनविरोध निवडीचा गुलाल उधळणारे शेखर धोटे (कोरपना) आणि नागेश्वर ठेंगणे (राजुरा) यांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वाधिक लाभ उल्हास करपे यांना झाला असून ते बिनविरोध निवडून आले आहेत.
चंद्रपूर जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत वेळोवेळी अतिशय नाट्यमय घडामोडी होत आहेत. आता निवडणुकीत खरी रंगत निर्माण झाली आहे. वरोरा (अ गट): जयंत टेमुर्डे, विजय देवतळे, वसंत विधाते यांच्या लढत होईल. कोरपना तालुक्यात विजय बावणे विरुद्ध शेखर धोटे तर चंद्रपूर तालुक्यातील अट गटात : सुभाष रघाताटे विरुद्ध दिनेश चोखारे यांच्या लढत होईल.
रोहित बोम्मावर, ॲड. वासुदेव खेळकर, उमाकांत धांडे, किशोर ढुमणे, प्रकाश खरवडे, मिलिंद संगमवार, दशरथ कामतवार, तर ओबीसी गटात शामकांत थेरे, गजानन पाथोडे, सूर्यकांत खनके, शरद जिवतोडे तर अनुसूचित जाती-जमाती गटात प्रशांत बांबोडे, ललित मोटघरे, कोमल खोब्रागडे, मधुकर भगत, ॲड. नारायण जांभुळे आणि भटक्या विमुक्त व विशेष मागास प्रवर्ग: पांडूरंग जाधव, दामोदर रुयाकर, यशवंत दिघोरे यांच्यात लढत आहे. मतदान १० जुलै तर मतमोजणी ११ जुलै रोजी होईल