scorecardresearch

चंद्रपूर: ‘डीएनआर’च्या ‘कॅप्सुल टँकर’ने घेतला दोन युवकांचा बळी; संतप्त ग्रामस्थांचे पाच तासांपासून ‘रस्ता रोको’ आंदोलन

डीएनआर ट्रान्सपोर्टच्या कॅप्सुल टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत अनिकेत मत्ते (१८) व संकेत झाडे (२४) या दोन युवकाचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर अजय माथूलकर हा युवक गंभीर जखमी झाला.

चंद्रपूर: ‘डीएनआर’च्या ‘कॅप्सुल टँकर’ने घेतला दोन युवकांचा बळी; संतप्त ग्रामस्थांचे पाच तासांपासून ‘रस्ता रोको’ आंदोलन
चंद्रपूर: 'डीएनआर'च्या 'कॅप्सुल टँकर'ने घेतला दोन युवकांचा बळी; संतप्त ग्रामस्थांचे पाच तासांपासून 'रस्ता रोको' आंदोलन

चंद्रपूर : डीएनआर ट्रान्सपोर्टच्या कॅप्सुल टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत अनिकेत मत्ते (१८) व संकेत झाडे (२४) या दोन युवकाचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर अजय माथूलकर हा युवक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी चिंचाला येथे पाच तासापासून रस्ता अडवून धरत आंदोलन सुरू केले आहे. मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देत नाही, तोवर आंदोलन सुरू राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : अकोल्यात घराच्या अंगणात लावली गांजाची झाडे; राज्यातील इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

शहरापासून काही अंतरावरील चिंचाळा गावाजवळील धानोरा मार्गावर सकाळी १० वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अंकित व संकेत हे दोघे मित्रासोबत दुचाकीने जात असताना डीएनआर ट्रान्सपोर्टच्या कॅप्सुल टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत संकेत जागीच ठार झाला तर अंकित रुग्णालयात दगावला. दोघांच्या मृत्यूने चिंचाला व सिदूर गावातील संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. अवजड वाहतूक बंद व्हावी व मृत मुलांना न्याय मिळावा, यासाठी चक्का जाम आंदोलन सुरू केले. पाच तसापासून हे आंदोलन सुरू आहे. पडोली पोलीस घटनास्थळी पोहचले. मात्र, मदत मिळत नाही तोवर आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिल्याने पोलीस हतबल आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या