scorecardresearch

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

सावली तालुक्यातील हिरापूर येथे वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार

सावली तालुक्यातील हिरापूर येथे वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. भक्तदास श्रीरंग झारकर (४४) असे मृताचे नाव आहे.भक्तदास झरकर गुरुवारी वसंत पिपरखेडे आणि रजत राऊत यांच्यासह किसाननगर शेतशिवारालगत कोंडेखल मायनर लोडी पुलाजवळ बैल धुण्यासाठी गेले होते.

दरम्यान, तेथे दबा धरून बसलेल्या वाघाने झरकर यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.