चंद्रपूर:ताडोबाच्या महत्त्वपूर्ण वन्यजीव कॉरिडोरला धोका निर्माण करणाऱ्या ‘लोहारडोंगरी’ खाण प्रकल्पाविरोधात इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहात आंदोलनस्थळी महिलांनी एकत्र येत ‘थाळी बजाओ आंदोलन’ केले.बंडू धोतरे यांच्या उपोषण मंडपापुढे अनेक महिला एकत्रित येत मूकपणे थाळी बजाओ आंदोलन केले.

आंदोलनामध्ये सहभागी विविध संघटनातील महिला सहभागी झाल्या त्यामध्ये प्रामुख्याने जिजाऊ ब्रिगेड, महिला कांग्रेस कमिटी चंद्रपूर, इको प्रो संघटनेतील महिला, बाबूपेठ मधील विविध महिला बचत गट, राधाकृष्ण योग ग्रुप व खवतीने ए इस्लाम महिला संगठन सहभागी होत्या.

महिलांचा सहभाग

या आंदोलनात अर्चना चौधरी, चंदा वैरागडे, संजीवनी वासेकर, वैशाली चालखुरे, आशा दूधपचारे, जयश्री वाघधरे, अर्चना मांदाडे, सुचिता बांगपांडू, वैशाली तूमराम, लताताई होरे, जोशना उरकुडे, आरती येरगुडे, सदमा कुरेकर, प्रतिमा परकारे, मीनाक्षीताई ढुमणे, सुरेखा गौरकार, ज्योती खामणकर, संध्या कुरेकार, सविता चटप, वंदना पवार, कविता बावणे, लता जाजूलवार, रजनी मडावी, वनिता दयालवार, कांचन मोहुर्ले, सुनीता ठाकरे, प्रिया भुरे, माधुरी फाले, मनीषा डोळसकर, वैशाली भागवत, मनीषा कोहपरे,वैशाली कोडापे, नेहा शास्त्रकार, मोना बुरडकर, रुपाली मुल्लेवार, विशाखा लिपटे, आशा दूधपचारे, जयश्री वाघधरे, सुजाता वांगपंडू, कल्पना भेंडारे आदी महिला सहभागी झाले.

जोपर्यंत अन्नत्याग सत्याग्रहाच्या मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार आहे, रुग्णालयात उपचार सुरू असले तरी बंडू धोतरे यांचे उपोषण सुरूच ठेवले आहे. हा लढा केवळ माझा नाही, हा चंद्रपूरच्या जंगल व निसर्ग सोबत मानवी अस्तित्वाचा लढा आहे! असे मत बंडू धोतरे यांनी व्यक्त केले.

सत्याग्रहाच्या समर्थनार्थ ‘बाईक रॅली’

लोहारडोंगरी येथील प्रस्तावित लोह खाण प्रकल्पामुळे होणारा निसर्गाचा ऱ्हास आणि वाढता मानव-वन्यजीव संघर्ष लक्षात घेता, इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या ‘अन्नत्याग सत्याग्रहा’ला पाठिंबा देण्यासाठी व हि खान रद्द करण्यासाठी चंद्रपुरात भव्य ‘बाईक रॅली’ काढण्यात आली. “ताडोबा कॉरिडॉर वाचवा, लोहारडोंगरी खाण रद्द करा” अशा घोषणा देत शेकडो पर्यावरणप्रेमी, युवक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी या रॅलीत सहभाग नोंदवला. शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीला चंद्रपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, यावेळी शालिनी भगत व शोभा वाघमारे यांनी वाघाच्या प्रतिकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.