चंद्रपूर: “पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या, फ्लॉवर नही, फायर है मै”, हा पुष्पा चित्रपटातील डायलॉय सध्या सर्वत्र गाजत आहे. त्याला कारण दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जून याचा सुपरहिट पुष्पा चित्रपटाचा पुढचा भाग पुष्पा २ हा सिनेमा ५ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. लाल चंदनाच्या तस्करीवर हा चित्रपट आधारीत आहे. अतिशय महाग असलेले लाल चंदनाचे झाड हे जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात देखील आहे. एक नाही तर अशी तीन झाडे ताडोबा प्रकल्पात आहेत.

पुष्पा चित्रपटापासूनच लाल चंदन प्रसिद्धीच्या झोतात आले होते. या लाल चंदनाच्या अनेक रंजक कथाही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे या लाल चंदनाला अधिकच महत्व प्राप्त झाले. या लाल चंदनाची किंमत कोट्यावधीच्या घरात असल्याचे सांगण्यात येते.

forest cover , Sindhudurg district, Western Ghats,
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनआच्छादनात वाढ तर पश्चिम घाटात घट, चिंतेची बाब
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tabebuia rosea flowers Mumbai
निसर्गलिपी : बहराचा उत्सव
vasai virar palghar forest declined
शहरबात : उरलेल्या वसईला एकदा बघून घ्या…
Mumbai Municipal Corporation sent notice to developer for careless demolition of building
अंधेरीत बांधकाम व्यवसायिकाला पालिकेकडून नोटीस, इमारतीचे पाडकाम थांबवण्याचे आदेश
sonam wangchuck marathi news,
जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचे नागपुरात “हेरिटेज ट्री वॉक”
vasai palghar forest area
वसई, पालघरचे वनक्षेत्र ३५ टक्क्यांनी घटले, भूमाफियांकडून जंगलतोड
Raigad district administration will implement bamboo cluster scheme planting 35 lakh bamboos
रायगडात ३५ लाख बांबूची लागवड होणार

हेही वाचा – यवतमाळ : शेतकरी नवरदेवाने घोड्यावरून नव्हे तर बैलबंडीवरून काढली लग्नाची वरात, स्वत: धुरकरी बनलेल्या युवकाचे पंचक्रोशीत कौतुक

आता हेच लाल चंदन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात देखील असल्याची माहिती माेहुर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी दिली. ताडोबातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वन विभागाचे विश्रामगृह परिसरातच लाल चंदनाचे हे झाड उभे आहे. सध्या या लाल चंदनाला अतिशय मागणी असल्याची माहितीही थिपे यांनी दिली. लाल चंदनाची एकूण तीन झाडे येथे आहेत. या तिन्ही झाडांची आम्ही योग्य पद्धतीने निगा राखतो अशीही माहिती थिपे यांनी दिली. पुष्पा चित्रपटापासून लाल चंदन प्रसिद्धीच्या झोतात असले तरी ताडोबात बऱ्याच वर्षांपासून लाल चंदनाचे झाड आहे. बऱ्याच लोकांना या झाडाबद्दल पुरेशी कल्पना नाही. अनेकांना तर ताडोबात देखील लाल चंदनाचे झाड आहे याचीही माहिती नाही.

हेही वाचा – बुलढाणा : मोबाईलवर तीनदा तलाक म्हणत दिला घटस्फोट! पोलीस हवालदाराचे विवाहबाह्य संबंध…

मात्र बऱ्याच वर्षापासून हे झाड ताडोबात बहरते आहे. या झाडाची विशेष निगा राखण्यासाठी म्हणून तिथे एक चबुतरा केला आहे तसेच झाडावर त्याचे नाव देखील लिहिले आहे. ताडोबाच्या जंगलात येणारे पर्यटक तसेच वन्यजीव अभ्यासक ताडोबा प्रकल्पात देखील लाल चंदन आहे काय अशी विचारणा करतात, तसेच ताडोबात येणारा पर्यटक हा लाल चंदनाचे झाड बघूनच ताडोबा प्रकल्पाच्या बाहेर पडतो. ताडोबातील वाघांचे जसे पर्यटकांना आकर्षण आहे तसेच आता लाल चंदनाचे झाडही आकर्षणाचा विषय बनला आहे. पुष्पा चित्रपटानंतर आता या झाडाला बघणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.

Story img Loader