चंद्रपूर : मूल तालुक्यातील नवेगाव भुजला येथील दोन तरुण मिस्त्री बांधकामाच्या कामानिमित्त जुनासुर्ला गावात गेले असता विजेच्या उच्चदाब तारांचा धक्का बसून जागीच ठार झाले. विनोद मुकुंदा बोरकुटे (रा. नवेगाव भुजला) हरिदास शशिकांत चुधरी (रा. नवेगाव भुजला) असे मृत कामगारांचे नाव आहे.
बांधकाम सुरू असतानाच गावातून जाणाऱ्या उच्चदाब विजेच्या तारांचा चुकीने स्पर्श झाल्याने दोन्ही तरुण कामगारांना तीव्र धक्का बसला. धक्क्याचा परिणाम एवढा भीषण होता की, घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दोन्ही तरुण आपल्या कुटुंबाचे कर्ते पुरुष होते. या घटनेमुळे गावात शोककळा आहे.
