scorecardresearch

गोंदिया: आमची केंद्रात ४०० प्लस आणि राज्यात २०० प्लसची तयारी पाहून विरोधक घाबरलेले; बावनकुळे

देशात काँग्रेसने सत्तेचा गैरवापर केला. इंदिराजींनी तर देशात आणीबाणीच लावून जनतेला वेठीस धरले होते.

chandrashekar bawankule

देशात काँग्रेसने सत्तेचा गैरवापर केला. इंदिराजींनी तर देशात आणीबाणीच लावून जनतेला वेठीस धरले होते. यांनी त्यावेळी डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला बाजूला सारून दहशतवाद्यासारखे सरकार चालविली, घटना तोडली. पण आज मोदी संविधानाला गीता मानून देश चालवत आहेत त्यामुळे हे बावचळले आहेत . उद्याचा काळ त्यांना अंधारलेला दिसत आहे. आमची केंद्रात ४०० प्लस आणि राज्यात २०० प्लसची तयारी पाहून विरोधक घाबरले असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्जुनी मोरगाव येथे भाजप कार्यकर्ता मेळावा नंतर माध्यमांशी बोलताना केली .

हेही वाचा >>>अकोला: २६ वर्षांत २११७ हृदयरुग्णांना नवसंजीवनी; ‘लॉयन्स मिडटाऊन’चा पुढाकार

मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर हल्लातील दोषींना शिक्षा होणारच . त्यांच्यावरील हल्लेखोर हे ठाकरे गटाचे कार्यकर्ते असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यांचे बोलविते धनी कोण ? याचा पण तपास पोलीस करत आहे.त्यांना योग्य ती शिक्षा फडणवीसांचे
गृहखाते देणार असल्याचे चंद्रशेखर बावणकुळे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>नागरिकांना उन्हाळ्यात पाणी कपातीचे चटके, अकोला महापालिकेचा निर्णय

औरंगजेबाने मराठ्यांंवर अन्याय केला, अशा क्रूर कर्माचे नाव बदलून आता संभाजीनगर करण्यात आले. ही अभिमानाची बाब असून जे मागील सरकारला जमले नाही, ते शिंदे फडणवीस सरकारने करून दाखविले आहे. तर ज्या औरंबजेबाने महाराष्ट्राला उद्धवस्त केले त्या शहराचे नाव बदलविण्यासाठी मोदींना यावे लागले, असा टोला नाव न घेता चंद्रशेखर बावणकुळे यांनी खा. इम्तियाज जलील यांना लगावला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-03-2023 at 16:29 IST