नागपूर : कोण म्हणतो, राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केला? राज्यपालांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला धक्का बसेल असे कोणतेही वक्तव्य केले नाही आणि ते तसे करूही शकत नाहीत. कारण, भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता छत्रपती शिवरायांच्या कामापासून प्रेरणा घेऊन काम करतो, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यपालांची पाठराखण केली. बावनकुळे मंगळवारी नागपुरात प्रसार माध्यमाशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यपाल महाराष्ट्रात आल्यापासून ५० उदाहरणे अशी देता येतील जेव्हा त्यांनी ऐतिहासिक ठिकाणावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आस्था व्यक्त केली आहे. त्यामुळे ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला धक्का बसेल असे कोणतेही वक्तव्य करूच शकत नाहीत.

हेही वाचा >>> नागपूर येथील निषेध मोर्चात काँग्रेस नेते गिरीश पांडव यांची राज्यपालांवर टीका, म्हणाले “शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल भाजपचे…”

AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी
Sanjay Raut ANI
संजय राऊत यांचा रोख कुणाकडे? “सांगलीतून कुणाला अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करायची असेल..”
Sanjeev Sanyal
“UPSC म्हणजे वेळेचा अपव्यव”, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्याचं विधान; म्हणाले, “तुम्हाला खरोखरच…”

हेही वाचा >>> बांधकाम परवानगी शुल्कात १०० टक्के वाढीचा निर्णय रद्द; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरकरांना मोठा दिलासा

राऊतांनी सरकार पाडण्याच्या भानगडीत पडू नये

महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नव्हता त्यामुळे राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आले. हे सरकार मजबूत आहे.  उद्धव ठाकरे यांचे अनेक कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत.  त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकार पाडण्याच्या भानगडीत पडू नये, असा खोचक सल्लाही बावनकुळे यांनी दिला.