scorecardresearch

MLC Election Result : गाणार यांच्या पराभवानंतर प्रतिक्रिया देताना बावनकुळेंचे धक्कादायक विधान म्हणाले, “गाणार हे भाजपचे…”

MLC election update maharashtra 2023 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणार यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या.

chndrashekhar bawankule nago ganar
नागोराव गाणार यांच्या पराभवानंतर प्रतिक्रिया देताना बावनकुळेंचे धक्कादायक विधान

नागपूर : Maharashtra mlc election result 2023 नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपने पाठिंबा दिलेले शिक्षक परिषदेचे उमेदवार नागोराव गाणार हे भाजपचे उमेदवार नव्हते, असे धक्कादायक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे वृत्तवाहिन्यांशी बोलताना केले.

गाणार यांना भाजपने पाठिंबा दिला होता. संपूर्ण भाजपची यंत्रणा गाणारांच्या प्रचाराला लागलेली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणार यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. मतदानाच्या दिवशीही ठिकठिकाणी गाणारांसाठी भाजपने बुथ लावले होते. प्रचारातही भाजप नेते गाणार हे भाजपचेच उमेदवार असल्याचे सांगत होते.

हेही वाचा >>> MLC Election Result : मोठी बातमी, नागपुरात भाजपाला धक्का; मविआचे अडबाले सात हजार मतांनी विजयी

मात्र त्यांचा पराभव होताच भाजपने त्यांची भूमिका बदलली आणि गाणार हे भाजपचे उमेदवार नव्हते असा यु टर्न घेतला. गाणार यांच्या पराभवानंतर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, गाणार हे भाजपचे उमेदवार नव्हते तर ते शिक्षक परिषदेचे उमेदवार होते. भाजपचे उमेदवार असते तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 18:35 IST