नागपूर : निसर्गाचे चक्र पुन्हा एकदा पालटले असून वातावरणात मोठा बदल होत आहेत. येत्या २२ जानेवारीनंतर हवामानात बदल होणार असून ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे २३ ते २५ जानेवारीदरम्यान राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशातल्या विविध भागात किमान तापमानात चांगलीच घट होऊन कडाक्याची थंडी पडली. अशातच आता हवामान खात्याने काही भागात पावसाचा इशारा तर काही भागात ढगाळ वातावरणाचा इशारा दिल्याने पुन्हा एकदा आरोग्याच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. २१ जानेवारीपर्यंत हवामान कोरडे राहील, पण २२ जानेवारीपासून हवामानात बदल होणार आहे.

Rain in summer in Nagpur risk of disease increase
नागपुरात उन्हाळ्यात पाऊस, ‘हे’ आजार वाढण्याचा धोका..
Heat wave again in Vidarbha Akola recorded the highest temperature on Friday
विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट? जाणून घ्या, अकोल्यात पारा कुठे पोहचला
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
climate changes Heat wave warning in Vidarbha
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, येत्या ४८ तासात…

हेही वाचा >>> ‘समृद्धी’वर पुन्हा अपघात! खासगी बस उलटली, २० प्रवासी जखमी

उत्तरप्रदेश, जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली या राज्यात मूसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तराखंडमध्ये येत्या ४८ तासात पाऊस तर उत्तरप्रदेश व उत्तर राजस्थानमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. बदलत्या वातावरणामुळे याठिकाणी तापमान पुन्हा एकदा कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.