scorecardresearch

खुल्या पिंजऱ्यातील आणखी एका चित्त्याकडून शिकार

नामिबियातील चित्ते भारतीय वातावरणाशी जुळवून घेत असल्याचे संकेत आता मिळत आहेत.

खुल्या पिंजऱ्यातील आणखी एका चित्त्याकडून शिकार

भारतीय वातावरणाशी जुळवून घेत असल्याचे संकेत

नागपूर : नामिबियातील चित्ते भारतीय वातावरणाशी जुळवून घेत असल्याचे संकेत आता मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय चित्तादिनी कुनो राष्ट्रीय उद्यानातील खुल्या पिंजऱ्यात सोडलेल्या चित्त्याने चितळाची शिकार केली. त्यामुळे या प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या आशा बळावल्या आहेत.

सप्टेंबर २०२२ मध्ये दक्षिण अफ्रिकेतील नामिबिया येथून भारतात आठ चित्ते आणण्यात आले. त्यात पाच मादी व तीन नर  आहेत. मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात या आठही चित्त्यांना आधी विलगीकरणात ठेवण्यात आले. त्यातील पाच मादी चित्त्यांना आता खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आले. त्यातील ‘त्बिलिसी’ याने आंतरराष्ट्रीय चित्तादिनी म्हणजेच रविवारी पहिली यशस्वी शिकार केली. तत्पूर्वी ‘आशा’ या मादीने पहिली यशस्वी शिकार केली होती. नामिबियातील चित्ता आता भारतीय वातावरणाशी जुळवून घेत आहे. मोठय़ा पिंजऱ्यात सोडल्यानंतर लवकरच त्यांनी शिकार सुरू केली. ‘साशा’, ‘सवाना’ आणि ‘सिया’ या मादी चित्त्यांनी मात्र अजूनही शिकार केलेली नाही. तीन नर चित्त्यांनी मात्र आधीच शिकारीला सुरुवात केली आहे.

प्रकल्प यशस्वी..

कुनो राष्ट्रीय उद्यानातील या आठही चित्त्यांची वर्तणूक सामान्य चित्त्यांसारखीच आहे. त्यामुळे उद्यानातील अधिकाऱ्यांमध्ये उत्साह आहे. अजूनपर्यंत तरी चित्त्यांनी अधिकाऱ्यांना अडचणीचे ठरेल असे आव्हान दिलेले नाही.  सर्व काही ठरल्यानुसारच होत आहे. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या