नागपूर : पदार्थांसोबतच नवनवीन विक्रम स्थापन करण्यासाठी प्रसिद्ध असलेले सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर २५ डिसेंबरला शालेय विद्यार्थी सोबत घेऊन आणखी एक नवा विक्रम स्थापन करण्यासाठी तयार झाले आहे. ख्रिसमसला वर्धा मार्गावरील बी. आर. ए. मुंडले हायस्कूलच्या सुमारे १२०० मुलांसोबत ५ हजार किलोंची भाजी तयार करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजी निवडणे, चिरणे आणि स्वच्छ करणे ही कामे मुले करणार आहे. तर भल्या मोठ्या कढईत फोडणी देण्याचे काम विष्णू मनोहर करणार आहेत. विशेष म्हणजे मुले पण आपल्या घरून भाजी आणणार आहे. मनोहर यांचा १५ वा विश्व विक्रम राहाणार आहे.

हेही वाचा: नागपूर : तीन हजार किलोचा चिवडा ; विश्वविक्रमाला सुरूवात

चिरलेली भाजी पाण्यात ठेवली तर खराब होत नाही. म्हणून शनिवार २४ रोजी मुले भाजी चिरून, कापून ठेवणार आहे. रविवारी सकाळी ९ वाजतापासून प्रत्यक्ष भाजी तयार करण्याला सुरूवात होईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chef vishnu manohar will prepare 5 thousand kg of vegetables with the school children of nagpur vmb67 tmb 01
First published on: 07-12-2022 at 12:50 IST