नागपूर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार शिवराज्यभिषेक दिनांकानिमित्त रेल्वे मंत्रालयाच्या आयआरसीटीसीच्‍या व महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने “भारत गौरव यात्रा टुरिस्ट ट्रेन” या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून “छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” यात्रा सुरू करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारशाला मानवंदना देणाकरिता सुरू करण्‍यात आलेल्‍या या उपक्रमातून पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित प्रमुख किल्ल्यांप्रमाणेच त्याभोवतीच्या धार्मिक स्थळांचा अविस्मरणीय प्रवास घडवून आणण्याची संधी मिळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट, भारत गौरव ५ दिवसीय यात्रा अंतर्गत पहिली ट्रेन येत्‍या, ०९ जून, २०२५ रोजी मुंबई सीएसएमटी स्थानकावरून सुटणार आहे. सदर यात्रा मुंबई -राजगड किल्ला, पुणे – शिवनेरी किल्ला, भिमाशंकर ज्योर्तीलींग – प्रतापगड किल्ला, कोल्हापूर – पन्हाळा किल्ला, मुंबई अशी राहील. याव्यतिरीक्त भिमाशंकर-ज्योर्तीलिंग मंदीर, कोल्हापूर-महालक्ष्मी मंदीर या तिर्थक्षेत्राला भेट देणार आहेत. सदर यात्रा दि९ जून ते १३ जून पर्यंत असून १४ जूनला पर्यटन गाडी रोजी मुंबईला परत येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यटकांनी या संधीचा लाभ असे आवाहन

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे. सदर सहलीची अधिक माहिती किंवा मदतीसाठी गौरव झा (८२८७९३१६००) यांच्याशी पर्यटकांनी संपर्क साधावा.