scorecardresearch

Premium

“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दरबारी…” नाना पटोले यांची टीका, म्हणाले… 

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर यांचा दौरा तपासला तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली वारी मध्येच जास्त वेळ घालवतात.

nana patole devendra fadanvis eknath shinde
नाना पटोले, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे

गोंदिया : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर यांचा दौरा तपासला तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली वारी मध्येच जास्त वेळ घालवतात. राज्याच्या जनतेकरिता फक्त घोषणा देणे, दिल्लीवाले पंतप्रधान देशासाठी घोषणा करतात तसे हे राज्य वाले राज्यात घोषणांचा पाऊस पाडण्याचा काम करतात, शेतकऱ्यांना अद्याप मदत दिली गेली नाही, बेरोजगारांचे प्रश्न सोडवले नाहीत, महागाई कमी करू शकले नाही, त्यामुळे माझ्या मते तर हे डेपुटेशन वर असलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेले आहे.

यांना कायम दर दोन दिवस आड दिल्ली मध्ये बोलाविले जाते आणि त्या दिल्ली दरबारी हुजरेगिरी करण्याचा काम राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतात अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी केली. नाना पटोले यांच्या वाढ दिवसानिमित्त सालेभाटा येथे त्यांची लाडू तुला करण्यात आली या प्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते. पुढे पटोले म्हणाले की अशी हुजरेगिरी महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नाही, नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री यांनी संभाजीनगर येथे सांगितले होते की आम्ही नरेंद्र मोदींचे हस्तक आहोत. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या  जनतेचे हस्तक नाहीच, त्यामुळे त्यांच्या कडून जास्त काही अपेक्षा करण्याचे कारण नाही, असे ही या प्रसंगी नाना पटोले म्हणाले.

Eknath SHinde Rahul Narwekar
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांपाठोपाठ विधानसभा अध्यक्षांचा परदेश दौरा रद्द, कारण काय?
Ajit Pawar Rohit Pawar
रोहित पवारांचेही भावी मुख्यमंत्रीपदाचे बॅनर, अजित पवार म्हणाले, “आता कुणीच…”
OBC movement Chandrapur
चंद्रपूर : ओबीसी आंदोलनाकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष; उपोषणकर्ते टोंगेंची प्रकृती खालावली
Maratha Kranti Morcha
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या ‘त्या’ विधानाचा मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chief minister eknath shinde devendra fadanvis delhi visit criticism nana patole sar 75 ysh

First published on: 05-06-2023 at 13:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×