नागपूर :- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, हैद्राबाद हाउस येथील कक्षामार्फत गरजु व पात्र रुग्णांना वैद्यकीय उपचाराकरीता अर्थसहाय्य अदा करण्याचे महत्वपूर्ण कामे केल्या जातात. यात रुग्णाच्या अर्जासोबत जोडण्यात येत असलेले उत्पनाचे प्रमाणपत्र जर बनावट आढळून आल्यास अशा रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधुन अर्थसहाय्य अनुज्ञेय राहणार नाही असे प्रसिद्धीपत्रकान्वये सांगण्यात आले आहे.

उत्पन्नाचे प्रमाणपत्र आपले सरकार सेवा केंद्रामधुन अधिकृतरीत्या तयार करण्यात आले पाहिजे. कोणत्याही दलालामार्फत अथवा एजंटमार्फत प्रमाणपत्र तयार करु नये. बनावट प्रमाणपत्र सादर केल्यास संबधीत अर्जदारावर व तसेच बनावट प्रमाणपत्रे तयार करणाऱ्यांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कार्यालयाने दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी गरीब रुग्णासाठी वरदान ठरली आहे. अनेकांना याचा फायदा झाला आहे. मात्र उत्पन्नाचा बनावट दाखला देऊन या योजनेचा लाभ घेण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत कठोर पावले उचलली गेली आहे. प्रमाणपत्र बनावट आढळून आल्यास योजनेतून निधी मिळणार नसल्याचे कळवण्यात आले आहे.