नागपूर : सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी कामठीतील गार्डस रेजिमेंटल सेंटरला भेट दिली आणि प्रशिक्षण घेत असलेल्या अग्निवीर जवानांशी संवाद साधला. तत्पूर्वी जनरल पांडे यांनी त्यांचे वडील डॉ. सी.जी. पांडे यांची भेट घेऊन, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जनरल पांडे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आले होते. हवाई दलाच्या सोनेगाव हवाई तळावर उतरल्यानंतर ते थेट आपल्या नागपुरातील घरी पोहोचले. त्यांचे वडील आजारी आहेत. त्यांची त्यांनी भेट घेतली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी ते कामठी येथील गार्डस रेजिमेंटल सेंटरला गेले. तेथे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा केली.

हेही वाचा >>> नागपूर : उत्सुकता शिगेला, मतमोजणी सुरू, गाणार, अडबाले की झाडे?

येथे अग्निवीरांचे प्रशिक्षण सुरू असून त्यांनी प्रशिक्षणार्थी अग्निवीर यांच्याशी संवाद साधला. तसेच प्रशिक्षकांना ते देत असलेल्या प्रशिक्षणाबाबत आणि त्यातील नाविन्यपूर्ण बाबीबाबत तसेच प्रशिक्षणार्थीच्या प्रतिसादाबाबतची माहिती घेतली. सोमवारी दुपारी नागपुरात पोहचून ते मंगळवारी दुपारी नवी दिल्लीकडे रवाना झाले. या दौऱ्याबाबत संरक्षदलाने कुठेही वाच्यता केली नव्हती. लष्कर प्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर काही दिवसातच ते नागपुरातील त्यांचे आजारी वडील यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यानंतर ते लष्कर प्रमुख म्हणून दुसऱ्यांदा नागपुरात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief of army staff general pandey interaction agniveer students rgt 74 ysh
First published on: 02-02-2023 at 09:35 IST