करोना, ‘म्युकरमायकोसिस’, ‘स्वाईन फ्लू’चा प्रकोप कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला असतानाच आता उपराजधानीत चिकनगुनिया आजारचा पहिला रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. पूर्व विदर्भातील नववर्षातील या आजाराचा हा पहिला रुग्ण आहे.

हेही वाचा- लोकजागर: गोरेवाड्याचे ‘गौडबंगाल’!

appointment of nurses in the municipal hospital was stopped due to the code of conduct
मुंबई : आचारसंहितेमुळे महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांची नियुक्ती रखडली
Nagpur, Beauty Parlors, Emerging , Hub for Prostitution, 220 Young Women, Trapped, in 4 Years, crime news, marathi news,
ब्युटी पार्लर देहव्यापाराचे मुख्य केंद्र, चार वर्षांत उपराजधानीतील २२० मुली देहव्यापारात
HDFC Bank home loans become expensive
एचडीएफसी बँकेचे गृहकर्ज महागले
Revenge Porn in Khamgaon
खामगावात ‘रिव्हेंज पॉर्न’चे व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ, सायबर विभागाची करडी नजर

उपराजधानीतील पोलीस लाईन टाकळी, अवस्थीनगर येथील २२ वर्षीय रुग्णाला फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, मळमळ, भूक न लागणे, अतिशय थकवा येणे आदी लक्षणे होती. घराजवळील डॉक्टरांकडून औषध घेतल्यावरही तरुणाचा त्रास कमी न झाल्याने त्याला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल करण्यात आले.

हेही वाचा- नागपूर: मराठी, हिंदी माध्यमातील संशोधकांना तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम ,मानव्यशास्त्राच्या संशोधकांसमोर अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी

रुग्णाची लक्षणे बघत त्याची चिकनगुनिया तपासणी केल्यावर त्याला हा आजार असल्याचे स्पष्ट झाले. तातडीने त्यावर उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान, उपराजधानीत गेल्या काही वर्षांमध्ये या आजाराचा एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे या रुग्णाची नोंद झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून या रुग्णाचा इतिहास घेऊन आवश्यक उपाय केले जात असल्याचा दावा केला जात आहे. या विषयावर आरोग्य उपसंचालक कार्यालयाला विचारणा केली असता त्यांनी एक रुग्ण फेब्रुवारीत आढळल्याचे मान्य केले.

हेही वाचा- अकोला : १३१ गावांमध्ये जलयुक्त शिवार; दुसरा टप्पा राबवणार

विषाणूपासून होणारा आजार

‘एडीस’ डासाच्या माध्यमातून पसरणारा चिकनगुनिया हा रोग एका विशिष्ट विषाणूपासून होतो. त्यामुळे ताप येणे, डोकेदुखी, सांधेदुखी, मळमळ होणे, भूक न लागणे, अतिशय थकवा येणे आदी एक वा अनेक लक्षणे दिसतात. ताप येऊन गेल्यावरही अनेक दिवस सांधेदुखी कायम राहते. थकवाही अधिक जाणवत असल्याने रुग्ण बरा झाला तरी काही दिवस आराम करणे गरजेचे आहे.

हेही वाचा- अमरावती : जिल्हा परिषदेचे शिक्षक पाच महिन्यांपासून पुरस्काराच्या प्रतीक्षेत

चिकनगुनियाची पूर्व विदर्भातील स्थिती

वर्ष – रुग्ण
२०२० – १५
२०२१ – ००
२०२२ – ०७
२०२३ – ०१