Chital hunting forest department Forest area arrest the hunter Rsj 74 ysh 95 | Loksatta

चंद्रपूर : तारांचे फास लावून चितळाची शिकार

चितळाच्या मांसाची विल्हेवाट लावत असताना वन कर्मचाऱ्यांनी धाड टाकून तुलाना येथील एका आरोपीस मुद्देमालसह ताब्यात घेतले.

chitals hunting
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

चंद्रपूर : मध्य चांदा वनविभागाच्या राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या टेंबुरवाही वन क्षेत्रातील कक्ष क्रमांक १६७ मध्ये तारांचे फासे लावून चितळाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली. यावेळी चितळाच्या मांसाची विल्हेवाट लावत असताना वन कर्मचाऱ्यांनी धाड टाकून तुलाना येथील एका आरोपीस मुद्देमालसह ताब्यात घेतले. मात्र, दोन आरोपी फरार झाले.

टेंबुरवाही नियतवनक्षेत्रातील कक्ष क्रमांक १६७ मध्ये आरोपींनी तार फासे लावून चितळाची शिकार केली. नंतर त्याचे मांसाचे तुकडे करून विल्हेवाट करीत असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली. माहिती मिळताच घटनास्थळी धाड टाकली असता तुलाना गावातील वडगू टेकाम हा व्यक्ती मांसासह आढळून आला. त्याला ताब्यात घेण्यात आले, मात्र यात सहभागी असलेले इतर दोन आरोपी फरार झाले. ताब्यात घेतलेल्या आरोपी कडून ८ किलो चितळाचे मांस, चामडे, २१ नग तार फासे जप्त करण्यात आले.

हेही वाचा >>> नागपूर : “प्लेबॉय” जेव्हा वाघाची शिकार करतो, ते ही अंधश्रद्धेतून..

याप्रकरणी आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी वडगू काशिनाथ टेकाम याला अटक करण्यात आली. फरार आरोपीचा शोध सुरू आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांचे नेतृत्वात क्षेत्र सहायक संतोष संगमवार, प्रकाश मत्ते, वनरक्षक अर्जुन पोले, वर्षा वाघ, सायस हाके, एस.डी. सुरवसे, सुनील गजलवार, मीरा राठोड, डी.एम. चंदेल, सुनील मेश्राम यांनी केली. पुढील तपास सुरू आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 17:09 IST
Next Story
चंद्रपूर : दहाव्या वर्गातील निशिता जाणार अमेरिकेच्या ‘नासा’मध्ये, ‘लिफोलॉजी’चा ‘डायमंड एस.’ पुरस्कार जिंकला