गोंदिया : गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय राज्यमहामार्गावर मुरदोली जंगल परिसरातील वाघदेव देवस्थानाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक चितळ गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास घडली.यावेळी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाटसरून जखमी चितळ विव्हळत असल्याचे दिसून आल्याने त्यांनी याची माहिती वन विभागाला दिली.

दरम्यान, गोरेगाव वनपरिक्षेत्राच्या पथकाने घटनास्थळ गाठून जखमी चितळाला गोरेगाव येथील वन विभागाच्या कार्यालयात आणून त्याच्यावर उपचार करण्यात आले. मागील महिन्यात ११ ऑगस्ट रोजी याच परिसरात एका कारच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची घटना याच परिसरात घडली होती. तर एका महिन्यातच ही दुसरी घटना घडली असून या परिसरात नेहमी वन्यप्राण्यांचा वावर राहत असताना या घटनेमुळे पुन्हा एकदा वन्यप्राणी सुरक्षित नसल्याची भावना वन्यजीव प्रेमींकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ अर्जुनी मोरगाव ते रामटेक मार्गाचे बांधकाम पूर्ण होऊन एक ते दिड वर्षाचा कालावधी लोटत असताना महामार्गावर वन्यजीवांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कसलीच माहिती किंवा फलक अथवा गतिरोधक बसविण्यात आले नव्हते. त्यात ऑगस्ट महिन्यात मुरदोली जंगल परिसरात कारच्या धडकेत एका वाघाचा बळी गेला.या घटनेमुळे वन विभागाला जाग येत जंगल परिसरात वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुचना फलक बसविण्यात आले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा >>>प्रफुल्ल पटेल म्हणतात, “शरद पवारांसोबतचे ‘ते’ छायाचित्र आयुष्यातील एक…”

तर या महामार्गावर तातडीने २६ गतिरोधक बसविण्याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला. मात्र, सदर आराखडा सद्या तरी फाईलीतच असून अद्यापही गतिरोधक बसविण्यात आलेले नाही. त्यातच आताही दुसरी घटना घडली. विशेष म्हणजे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ नागझिरा अभयारण्य आणि वन विभागाच्या जंगलातून मुरदोली, गोरेगाव मार्गे जातो. या जंगल परिसरात सद्यास्थितीत वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, चितळ, हरीण या दुर्मिळ प्रजातींचे वन्यप्राणी या मार्गावर फिरत असतात, मात्र या महामार्गावरून वाहने इतक्या वेगाने जातात की वन्यजीव या वाहनांच्या तावडीत सापडत असून वाहनाच्या धडकेत अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे.

तर वाहन चालकही गंभीर जखमी झाल्याच्या नोंदी आहेत. दरम्यान, जखमी चितळ प्रकरणी गोरेगावचे वनपरिक्षेत्राधिकारी मनोज गाढवे यांच्याशी संपर्क केला असता सदर चितळला गोरेगाव येथील कार्यालयात आणले असून उपचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader