scorecardresearch

Premium

श्शु… ‘टायगर जिंदा हैं!’ नव्या ‘टायगर’च्या आगमनाने गावात सामसूम; दहशत अशी की…

सेलू तालुक्यातील हिंगणी येथून वाघाची शनिवार पासून भ्रमंती सुरू झाली.

citizens worried new tiger footprints found Tadgaon area wardha
वाघाच्या पाऊलखुणा (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

वर्धा: समुद्रपूर परिसरात ताडगाव शिवारात १५ दिवस दहशत पसरवून एक वाघ शेवटी चिमूरकडे रवाना झाला. त्यास आता आठवडा लोटत नाही तोच पुन्हा एका वाघाच्या डरकाळ्या परिसरास सुन्न करणाऱ्या ठरत आहे.

हिंगणी, सेलू परिसरात ज्या वाघाच्या पाऊलखुणा आढळल्या होत्या, तो वाघ ताडगाव परिसरात आढळून आलेला नाही. हा दुसराच वाघ असल्याचे उपविभागीय वनाधिकारी पवार यांनी सांगितले.

wife murdered husband help son nashik
नाशिक: मद्यपी पतीच्या त्रासाला वैतागून मुलाच्या मदतीने गळफास; नाशिक जिल्ह्यातील घटना
women died lightning Chichala
चंद्रपूर : वीज पडून एक ठार, दोघ जखमी; मूल तालुक्यातील चिचाळा येथील घटना
young man drowned during immersion
जळगाव जिल्ह्यात विसर्जनावेळी तरुण बुडाला, शोध चालू
devotee drowned pond Ganesh Visarjan buldhana
बुलढाणा: गणेश विसर्जनदरम्यान भाविक तलावात बुडाला!

हेही वाचा… दोन्ही खिशात पैसे तर एकाच खिशातील कसे लुटले? पोलिसांचा तर्क अन् बनाव उघड

सेलू तालुक्यातील हिंगणी येथून त्याची शनिवार पासून भ्रमंती सुरू झाली. आता तो अल्लीपुर पुढे शिवणगाव परिसरात असल्याची माहिती आहे. मजल दरमजल करीत त्याने दोन दिवसात हिंगणघाट तालुक्यातील वनक्षेत्रात प्रवेश केला. आज वन तसेच पोलीस अधिकारी या परिसरात पोहचत असल्याची माहिती देण्यात आली. याच परिसरात असलेल्या सिंचन प्रकल्पाच्या विश्रामगृहालगत वाघाच्या पायाचे ठसे दिसून आले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Citizens worried due to new tiger footprints found in tadgaon area wardha pmd 64 dvr

First published on: 26-09-2023 at 13:42 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×