scorecardresearch

नागपूर : …तर आशा वर्कर पुन्हा संपावर जाणार! सीआयटीयू म्हणते…

आशा गटप्रवर्तक कर्मचारी युनियनने (सीआयटीयू) २३ दिवसांचा संप यशस्वी केल्यावर गुरूदेव सेवाश्रम सभागृहात विजय मेळावा घेतला.

CITU meet Nagpur
नागपूर : …तर आशा वर्कर पुन्हा संपावर जाणार! सीआयटीयू म्हणते… (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नागपूर: आशा गटप्रवर्तक कर्मचारी युनियनने (सीआयटीयू) २३ दिवसांचा संप यशस्वी केल्यावर गुरूदेव सेवाश्रम सभागृहात विजय मेळावा घेतला. याप्रसंगी विधानसभा अधिवेशनापूर्वी शासनाने आश्वासनानुसार शासन आदेश न काढल्यास पुन्हा संपाचा इशारा युनियनचे नेते राजेंद्र साठे यांनी दिला.

कार्यक्रमात राजेंद्र साठे म्हणाले, विधानसभा अधिवेशनापूर्वी शासनाने दिलेल्या आश्वासनाचा शासन आदेश काढायलाच हवा. जेणेकरून आशा वर्कर आणि इतरांना न्याय मिळेल. हा आदेश निघाला नाही तर पुन्हा संपावर जावे लागू शकते. संपामध्ये आशा वर्कर आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांची उपस्थिती चांगली होती. सगळ्यांच्या एकीमुळेच हे यश मिळाले.

arrested newsclick editor journalist
‘न्यूजक्लिक’च्या संपादकांना सात दिवसांची पोलीस कोठडी
News About Gautami Patil
नागपूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा! खुर्च्यांची तोडफोड झाल्यानंतर पोलिसांचा सौम्य लाठीमार
neet pg applications
शून्य ‘पर्सेटाइल’ होताच एनआरआयची रांग; ‘नीट-पीजी’साठी एकाच दिवसात तब्बल ६०० अर्ज
Navi Mumbai Municipal Commissioner Rajesh Narvekar went to the reservoir for ganesh immersion
नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर स्वतः तराफ्यावरून जलाशयात उतरले, स्वयंसेवकांचा उत्साह द्विगुणित

हेही वाचा – यवतमाळ : चायनीज मांज्याने चिमुकल्याचा गळा चिरला, बंदी असतानाही सर्रास विक्री

हेही वाचा – प्रवाशांसाठी आनंदवार्ता; अमरावती-पुणे-अमरावती द्विसाप्‍ताहिक‍ विशेष एक्‍स्‍प्रेसला मुदतवाढ

याप्रसंगी सर्व उपस्थित आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला. कार्यक्रमात वंदना पंडित यांनी क्रांतीकारी गित सादर केले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी आतषबाजी करून नृत्य केले. याप्रसंगी माया कावळे, आरती चांभारे, उज्वला कांबळे, नीलिमा कांबळे, गीता विश्वकर्मा, कनिजा शेख, मेहरूनिसा कनोजे, कोमेश्वरी गणवीर आदी उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Citu held a victory meet at gurudev sevashram hall in nagpur after the strike was successful mnb 82 ssb

First published on: 20-11-2023 at 15:43 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×