नागपूर : दहावीच्या विद्यार्थिनीची मिरवणुकीत एका युवकाशी ओळख झाली. त्याने एका चिठ्ठीवर लिहून तिला भ्रमणध्वनी क्रमांक दिला. त्यातून दोघांची मैत्री झाली आणि प्रेमही फुलले. काही दिवसांतच त्या मुलीने घरातून पळ काढला आणि प्रियकराचे घर गाठले.

मुलगी अचानक बेपत्ता झाल्यामुळे आईवडिलांना धक्का बसला तर दुसरीकडे मुलगी प्रियकराच्या बाहुपाशात उद्यानात बसलेली पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी मुलीचे समूपदेशन केले आणि तिला आईवडिलांच्या ताब्यात दिले.मुलगी १५ वर्षाची असून ती दहाव्या वर्गात शिकते. दोन वर्षापूर्वी धार्मिक मिरवणूक पाहण्यासाठी गेली होती. तेथे एका युवकासोबत तिची ओळख झाली.

Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Delhi Crime Case Doctor Murder
Delhi Doctor Murder Case : विवाहबाह्य संबंध, लग्नाचं आमिष अन् हत्या; दिल्लीतील हत्याप्रकरणी डॉक्टर, नर्स आणि अल्पवयीन मुलामधील संबंधांचा उलगडा!
Vice President said Today we are in corruption free India
नागपूर : देशातून दलालांची जात संपूर्णपणे नष्ट, उपराष्ट्रपती धनखड म्हणतात,‘सरकारी नोकऱ्या…’
Uddhav Thackeray VS CJI DY Chandrachud
Uddhav Thackeray : “अन्यथा सरन्यायाधीशांनी गणपती बाप्पाला पुढची तारीख दिली असती”, ‘त्या’ भेटीवरून उद्धव ठाकरेंचा चिमटा
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो

हे ही वाचा… नागपूर : देशातून दलालांची जात संपूर्णपणे नष्ट, उपराष्ट्रपती धनखड म्हणतात,‘सरकारी नोकऱ्या…’

ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. दोघांनी एकमेकांचे भ्रमणध्वनी क्रमांक घेतले. काही दिवसांत दोघांच्या भेटी व्हायला लागल्या. ती दहावीचा अभ्यास सोडून त्या युवकाच्या प्रेमात पडली. दोघेही उद्यानात भेटायला लागले. शनिवारी अभ्यासावरून तिला आई वडिलांनी रागावले. त्यांच्या रागावर तिने घर सोडले. बराच वेळ होवूनही ती घरी परतली नाही. तेव्हा कुटुंबीयांना चिंता झाली. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, कुठेच मिळाली नाही.

त्यांनी पाचपावली पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली. अनैतिक मानवी वाहतूक पथकाकडे हे प्रकरण सोपविण्यात आले. प्रमुख पोलीस निरीक्षक ललिता तोडासे यांच्या नेतृत्वात शोध घेण्यात आला. तिचे मोबाईल लोकेशन कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत मिळून आले. पोलिसांनी परिसरात शोध घेतला असता विद्यार्थिनी आणि तिचा प्रियकर एका उद्यानात मिळाले. त्यांची चौकशी करीत पोलीस ठाण्यात आणले. अल्पवयीन मुलगी सुरक्षित असल्याचे माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. मुलीला सुखरुप पाहताच आई वडिलांच्या डोळ्यात पाणी तरळले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त राहुल माकणिकर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ललिता तोडासे, सफौ. राजेंद्र अटकाळे, गजेंद्रसिंग ठाकूर, पोहवा श्याम अंगुथलेवार, दीपक बिंदाने, ऋषिकेश डुमरे, विलास चिंचुलकर, दीप गीते यांनी केली.

हे ही वाचा…बुलढाणा : संकलन साहित्य संपले, पण रक्तदात्यांची रांग कायम!

अभ्यासाची भीती अन प्रियकराची साथ

मुलगी दहावीत असून युवक घर गवंडी आहे. दहावीत मुलीला शिकवणी लावलेले आहेत. परंतू, तिला अभ्यासाची भीती वाटते. परीक्षेत नापास झाल्यास आईवडिल रागावतील आणि पुढील शिक्षण बंद करतील, असे तिने प्रियकराला सांगितले. त्यानेही संधी साधून तिला घर सोडण्याचा सल्ला आणि शिक्षणासाठी पैसे लावण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे त्या मुलीने घर सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.