scorecardresearch

Premium

चंद्रपूर : ओबीसी आंदोलनाकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष; उपोषणकर्ते टोंगेंची प्रकृती खालावली

मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दिवसापासून ओबीसी आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने संपूर्ण ओबीसी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

OBC movement Chandrapur
चंद्रपूर : ओबीसी आंदोलनाकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष; उपोषणकर्ते टोंगेंची प्रकृती खालावली (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

चंद्रपूर : मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दिवसापासून ओबीसी आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने संपूर्ण ओबीसी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशातच उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांची ११ व्या दिवशी प्रकृती खालावली आहे. टोंगेंच्या जिवाचे वाईट झाल्यास संपूर्ण राज्यात उद्रेक होईल, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिला आहे. मुसळधार पावसातही आंदोलन सुरू.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे ११ दिवसांपासून अन्नपाणी त्यागून उपोषण करीत आहेत. आतापर्यंत वनमंत्री मुनगंटीवार वगळता सरकारमधील एकाही मंत्र्याने त्यांची भेट घेतली नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे त्यांनी मराठा समाजाचे मनोज जरांगे यांच्या उपोषणाला भेट दिली. उपोषण मंडपात आरोग्य सेवा व इतर सुविधा पुरवल्या. राज्य सरकारचे चार मंत्री दररोज जरांगे यांची भेट घेत होते. मुख्यमंत्री आले तर उपोषण मागे घेऊ, असे जरांगे पाटील यांनी सांगताच मुख्यमंत्री लगेच उपोषण सोडवायला गेले. मात्र येथे ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी रवींद्र टोंगे ११ दिवसांपासून अन्नपाणी त्याग करून आंदोलन करीत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी साधा फोन करून त्यांची चौकशीदेखील केली नाही. त्यामुळे ओबीसी समाजात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याप्रति तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ajit_pawar_chhagan_bhujbal
“…त्याशिवाय अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत”, छगन भुजबळांचं नाशिकमध्ये वक्तव्य, म्हणाले…
ajit pawar
फडणवीसांच्या शुभेच्छा, राष्ट्रवादीच्या धर्मराव आत्राम यांनाही विश्वास; अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चेला नवे धुमारे
dewndra fadanvis, Statement of Devendra Fadnavis regarding Dhangar Samaj reservation in pune
धनगर समाज आरक्षण: मुख्यमंत्र्यांनी एवढी सकारात्मकता दाखवल्यावर निश्चित मार्ग निघेल; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
manoj-jarange-patil-eknath-shinde
मनोज जरांगेंच्या भेटीला जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “तांत्रिक बाबी…”

हेही वाचा – भद्रावतीच्या कन्येच्या प्रश्नाने केंद्रीय विदेशमंत्री भारावले

हेही वाचा – अट्टल पण छुपा मद्यपी कसा असतो? लक्षणे व उपचार काय? वाचा सविस्तर…

आज उपोषणाच्या ११ व्या दिवशी टोंगे यांची प्रकृती खालावली. त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. त्यांच्या जिवाचे बरेवाईट झाल्यास राज्यात उद्रेक होईल. या उद्रेकाची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री पवार यांची राहील, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने देण्यात आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm and deputy cm neglect of obc movement in chandrapur the condition of ravindra tonge deteriorated rsj 74 ssb

First published on: 21-09-2023 at 11:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×