गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात सिंगापूरच्या धर्तीवर ‘नाईट सफारी’, ‘अफ्रिकन सफारी’ आणि ‘इंडियन सफारी’ सुरू करण्याचे स्वप्न नागपूरकरांना वनखात्याने दाखवले, पण तब्बल एक तपानंतर सुरू झालेला हा प्रकल्प अजूनही पूर्णत्वास आलेला नाही. या प्रकल्पातील मुख्य आकर्षण असलेल्या या तीनही सफारीचे काम जागेअभावी अडकले आहे. मात्र, आमदार असतानापासून या प्रकल्पाचा प्रश्न लावून धरलेल्या नागपूरकर मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी इंडियन व नाईट सफारीचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या प्रकल्पाविषयीच्या आशा बळावल्या आहेत.

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय या ‘पीपीपी’ तत्त्वावरील प्रकल्पाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. या बैठकीला मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेसी, वनखात्याचे सचिव विकास खारगे, नागपूर महानगरपालिका आयुक्त अश्विन मुदगल, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचाल यू.के. अग्रवाल, वनसंरक्षक जे.पी. त्रिपाठी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. खासगी-सार्वजनिक सहभागातून नागपुरात गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय विकसित करण्यात येत आहे. याकरिता रस्त्यालगतची २५.५७ हेक्टरची सुयोग्य जमीन गुंतवणूकदारांना देण्याबाबत आजच्या बैठकीत विचार करण्यात आला.

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
seven houses were burn in fire due to explosion of gas cylinder
जामनेर तालुक्यातील आगीत सात घरे भस्मसात, गॅस सिलिंडरच्या स्फोटाने गाव हादरलेन
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील बचाव केंद्र आणि काही अंतरावरील सफारीचे उद्घाटन डिसेंबर २०१५ मध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर याठिकाणी सायकल सफारी, रात्र सफारी, दिवसा सफारी सुरू करण्यात आले. प्रायोगिक तत्त्वावरील या सफारीला नागपूरकरांनी प्रतिसाद दिला. मात्र, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या प्राणिसंग्रहालयामागे विदेशी पर्यटकांना आकर्षित करणे हा मुख्य उद्देश होता. तसेच बाहेर देशात जाऊ न शकणाऱ्या भारतीयांना त्याठिकाणच्या सफारीचा आनंद नागपूरात घेता यावा, हा देखील उद्देश होता. त्यासाठीच सिंगापूरच्या धर्तीवर नाईट सफारी, इंडियन तसेच अफ्रिकन सफारी याठिकाणी सुरू करण्यात येणार होती. मात्र, आवश्यक जमिनीअभावी या कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. ही जमीन गोरेवाडा गावापलीकडची आणि बासपासला लागून असलेली जमीन आहे. तीन तलावाच्या मध्यातल्या या जमिनीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले. त्यामुळे डिसेंबर २०१८ पर्यंत हा या सफारीचे काम पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

इंडियन सफारी – दुर्मीळ होत  चाललेले वाघ, चिता आणि इतर वन्यप्राणी

अफ्रिकन सफारी – जिराफ, झेब्रा आणि इतर

नाईट सफारी – रात्रीच्या वेळी विहार करणाऱ्या प्राण्यांचा थरार