अमली पदार्थांच्या आडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

अंमली पदार्थांच्या आडून अशी वातावरणनिर्मिती करून महाराष्ट्राच्या ख्यातीला बदनाम करण्याचा हा डाव आहे.

Uddhav-Thackeray-9
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (संग्रहीत छायाचित्र)

नागपूर : जगातील अमली पदार्थ जणू काही महाराष्ट्रातच तयार होत आहेत आणि ते पकडण्याची कामगिरी फक्त विशेष चमूच पार पाडू शकते, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. अंमली पदार्थांच्या आडून अशी वातावरणनिर्मिती करून महाराष्ट्राच्या ख्यातीला बदनाम करण्याचा हा डाव आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीला अशा पद्धतीने डावलण्याचा प्रयत्न होत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

नागपूर येथे शुक्रवारी आयोजित जलदगती डीएनए तपासणी व वन्यजीव तपासणी प्रयोगशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी ऑनलाइन सहभागी होऊन महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. सोबतच महाराष्ट्रात अमली पदार्थवरून तापलेल्या वातावरणावरही अप्रत्यक्ष भाष्य केले. अमली पदार्थाला सध्या मोठे पेव फु टले आहे आणि त्यावरून महाराष्ट्राला लक्ष्य के ले जात आहे. पण, महाराष्ट्र हे बोलघेवड्यांचे राज्य नाही. येथे जे बोलले जाते ते करूनही दाखवले जाते. अंमली पदार्थांच्या धाडीवरून विशेष चमूचे विशेष कौतुक होत आहे. कारण त्यात ‘हिरो’ होते आणि त्यामुळे या विशेष चमूलाही प्रसिद्धी मिळाली. मात्र, चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी २५ कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ पकडले, पण त्यात ‘हिरोईन’नव्हती. त्यामुळे एवढ्या मोठ्या कामगिरीची कु ठे दखलही घेतली गेली नाही आणि महाराष्ट्र पोलिसांचे कु ठे कौतुकही झाले नाही. महाराष्ट्र पोलीस दल मजबूत आहे, तत्पर आहे. गुन्हेगारांना येथे दयामाया दाखवली जात नाही तर त्याला शिक्षेपर्यंत पोहोचते के ले जाते. अशा महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीला आणि महाराष्ट्राच्या ख्यातीला बदनाम करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि तो आपल्याला मोडून काढायचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. २५ कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ पकडणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक व्हायलाच हवे, असेही त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आवर्जून सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cm uddhav thackeray inaugurated wildlife dna testing lab in nagpur zws

Next Story
‘तो’ पोपट १५ दिवसांपासून वन कोठडीतच
ताज्या बातम्या