नागपूर: केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि परीक्षांमधील पेपरफुटी विरोधात ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखाली देशातील हजारो तरुण रस्त्यावर उतरले आहेत. देशभरातील वाढती बेरोजगारी, परीक्षांमधील गैरप्रकार आणि सरकारी अनास्थेमुळे तरुणाईमध्ये मोठा आक्रोश पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणाई रस्त्यावर उतरली होती. यावेळी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे सह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ही राजीनामा मागण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावर अभिजीत दी lपके यांनी महत्त्वाचे विधान केले.

मोदी विद्यार्थ्यांच्या मनातील गोष्ट कधी ऐकणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी देश आणि जगातील घडामोडींवर द्वीट करत असतात, मात्र ‘नीट’ परीक्षा रद्द झाल्यामुळे आणि पेपर फुटल्यामुळे देशातील पाच निष्पाप विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, यावर त्यांनी साधे एक द्वीटही केले नाही. पंतप्रधान सतत स्वतःच्या ‘मन की बात’ करतात, पण त्यांनी देशातील विद्यार्थ्यांच्या ‘मनाची बात’ कधीतरी ऐकावी, अशा घणाघाती शब्दांत कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांनी केंद्र सरकारवर तीव्र निशाणा साधला आहे.

नेमके काय म्हणाले दीपके?

नीट सारख्या देशातील अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेचे पेपर लीक होतात, मात्र कोणावरही ठोस जबाबदारी निश्चित केली जात नाही. या मोठ्या घोटाळ्यानंतर सरकारने केवळ काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करून मलमपट्टी केली गाने गांग गावं निलंबित करण्याची हिंमतही द केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा देत दीपके यांनी आगामी २० जून रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर मोठ्या आंदोलनाची घोषणाही यावेळी करण्यात आली. आधी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात येईल त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याही राजीनामासाठी आंदोलन केले जाईल असे दीपक यांनी सांगितले.

सरकारने हलक्यात घेऊ नये

आपल्यावरील कथित मारहाणीचा संदर्भ देत दीपके यांनी देशातील आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर बोट ठेवले. ते म्हणाले की, मला ज्याने मारहाण केली त्यावरूनच आपल्या देशात किती भीषण बेरोजगारी आहे हे स्पष्टपणे दिसून येते. आज देशातील तरुण हजार-दोन हजार रुपयांसाठी काहीही करायला तयार आहेत, एवढी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. जर या युवकांच्या हाताला रोजगार असता, तर पैशांसाठी कोणीही असे कृत्य केले नसते. सरकार सध्या मला हलक्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे, पण या देशात जनतेला हलक्यात घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाते, असेही ते म्हणाले.

किती स्मार्ट सिटी झाल्या?

विकासाच्या नावावर भाजप निवडणुका जिंकत असल्याचा दावा करते, पण देशाचा नेमका काय विकास झाला? देशात २०० ‘स्मार्ट सिर्ट घोषणा करण्यात आली होती, सरकारने एक तरा शहर पूर्णपणे स्मार्ट करून दाखवावे. गेल्या १२ वर्षांपासून फक्त बुलेट ट्रेनच्या घोषणा सुरू आहेत, पण आजतागायत एकही बुलेट ट्रेन धावू शकलेली नाही, असा आरोपही केला.