‘चटणी-भाकर’ आंदोलन पाठोपाठ मंगळवारी काँग्रेसने ‘डफडे बजाओ’ आंदोलन करीत जिल्ह्यात ओला दुष्काळासह विविध मागण्या शासनाकडे सादर केल्या. आंदोलनामुळे चिखली तहसील परिसर कार्यकर्त्यांनी गजबजला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता सर्वच राजकीय पक्ष सरसावल्याचे चित्र आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चटणी-भाकर आंदोलन करण्यात आले.

पाडव्याच्या मुहूर्तावर काँग्रेसने तहसील कार्यालयासमोर डफडे वाजवत शेतकऱ्यांप्रती उदासीन असलेल्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी डफडे वाजवले. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना नुकसानभरपाई द्यावी, आनंदाचा शिधा वाटप करावे, शेतकऱ्यांना तत्काळ विमा द्यावा, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा :शेतकरी बांधवांनो आत्महत्या करू नका; नाना पटोले यांचे आवाहन

जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सत्येंद्र भुसारी, अशोक पडघान, सचिन बोंद्रे, माोहमद इसरार, जगन्नाथ पाटील, पांडुरंग भुतेकर, विजया खडसन, संगीता गाडेकर, विद्या देषमाने, अनिता घुगे, राम डहाके, प्रदीप पचेरवाल, रफिकभाई, दिपक खरे आदी सहभागी झाले.