नागपूर: आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये युवा मतदारांचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्याची सुधारित मतदार यादी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यात २ लाख १० हजार ५९५ नव्या मतदारांची भर पडली असून त्यात १८ ते १९ वर्ष वयोगटातील मतदारांची संख्या ८८ हजार ४४४९ आहे.

हेही वाचा >>> गडचिरोली : वैनगंगा नदीत नाव उलटल्याने सहा महिला बुडाल्या; चामोर्शी तालुक्यातील घटना, महिलांचा शोध सुरू

Dhangekar Kolhe and supriya Sule sat in front of the stage in the hot sun.
मोदींना सत्तेचा उन्माद! ; शरद पवार यांचा आरोप; पुणे जिल्ह्यातील मविआ उमेदवारांचे अर्ज दाखल
Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
Mild earthquake tremors in Akola district
अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे
Liquor stock worth 28 lakh seized Gadchiroli action befor elections
गडचिरोली : २८ लाखांचा मद्यसाठा जप्त; निवडणुकांचा पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

१६ एप्रिलनंतर लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. सुधारित मतदार यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. तत्पूर्वी मतदार नोंदणी दरम्यान नव्याने नाव नोंदवलेल्या मतदारांची संख्या जिल्हा निवडणूकअधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यात २ लाख १० हजार ५९५ नव्या मतदारांची भर पडली असून त्यात १८ ते १९ वर्ष वयोगटातील मतदारांची संख्या ८८ हजार ४४४९ आहे. वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या युवकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे म्हणून जिल्हा प्रशासनाने अनेक उपक्रम हाती घतले होते. महाविद्यालयांमध्ये यासाठी विशेष शिबीर घेण्यात आले. १७ वर्ष पूर्ण करणाऱ्या युवकांकडूनही नोंदणी अर्ज भरून घेण्यात आले. मात्र त्यांचे नाव त्यांनी १८ वर्ष पूर्ण केल्यावरच मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. सध्या सर्वच पक्षाकडून तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर १८ ते १९ वर्ष वयोगटातील मतदारांची संख्या महत्वाची ठरते.  नागपूर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन (नागपूर, रामटेक) आणि विधानसभेच्या १२ जागा आहेत. यात नागपूर शहरात सहा तर ग्रामीणमध्ये सहा जागांचा समावेश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नागपूरचेच असून ते दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.