नागपूर : वन व पर्यावरण मंत्रालयाकडे प्रत्येक संस्थेला ‘ट्री बँक’ स्थापन करण्याची मान्यता देण्यासंदर्भातील प्रस्ताव देण्यात आला आहे. झाडांची संपूर्ण माहिती त्या माध्यमातून ठेवली जाईल. एका झाडाचे प्रत्यारोपण करायचे असल्यास पाच नवी झाडे लावावी लागतील व एक झाड तोडायचे असल्यास दहा झाडे लावावी लागणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्यावतीने महावृक्षारोपण उपक्रमांतर्गत ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग वृक्षारोपण’ या चळवळीचे उद्घाटन एलआयटी परिसरात गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. देशभरात मोठय़ा प्रमाणात रस्त्याची कामे सुरू असताना त्यावर वाहन चालताना प्रदूषण मोठय़ा प्रमाणात होत असते. त्यामुळे रस्त्याच्या आजूबाजूला झाडे लावण्याचे काम हाती घेतले आहे.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
Sangli
सांगली : तक्रार मागे घेण्यासाठी हॉस्पिटलकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी