गोंदिया : माजी राज्यमंत्री भरतभाऊ बहेकार यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री, गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा निवासी भरतभाऊ बहेकार (८२) यांचे मंगळवारी रात्री गोंदियाच्या बजाज हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान निधन झाले.

गोंदिया : माजी राज्यमंत्री भरतभाऊ बहेकार यांचे निधन
भरतभाऊ बहेकार

गोंदिया : महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री, गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा निवासी भरतभाऊ बहेकार (८२) यांचे मंगळवारी रात्री गोंदियाच्या बजाज हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान निधन झाले.

 बहेकार यांनी १९९०-९५ दरम्यान काँग्रेसच्या सत्ताकाळात राज्यमंत्री म्हणून वन, बांधकाम विभागाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी भाजपचे भैरसिंह नागपुरे यांचा पराभव केला होता. सालेकसा तालुक्यातील आमगाव खुर्दचे ते सरपंचही होते. त्यानंतर सालेकसा तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. ते गोंदिया जिल्हा काँग्रेस समितीच्या मार्गदर्शक मंडळात होते. राजकीय क्षेत्रात सर्वच पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अतिवृष्टीमुळे नागपूर विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा स्थगित
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी