scorecardresearch

“काँग्रेसचे नेते संभ्रम निर्माण करत आहेत”, बावनकुळे म्हणाले, “ओबीसींचे आरक्षण…”

मराठा समाजाला आरक्षण देताना ते वेगळ्या प्रवर्गातून देण्याची सरकारची भूमिका असल्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे.

Congress leaders are creating confusion Bawankule
बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देताना ते वेगळ्या प्रवर्गातून देण्याची सरकारची भूमिका असल्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे. मात्र त्यानंतर काँग्रेसचे नेते जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यामुळे मराठा व ओबीसी समाजाचा काँग्रेसवर विश्वास राहिलेला नसल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

बावनकुळे यांच्या निवासस्थानी गणरायाची स्थापना झाल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. ओबीसी महासंघाने आंदोलन आणि मोर्चा काढला असून त्यात भाजपसह सर्वपक्षीय नेते होते. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सर्वपक्षीय बैठकीत ठरले आहे आणि सरकारने त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या आंदोलनाला सर्व पक्षाच्या नेत्यांनी समर्थन केले आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल मात्र त्यात ओबीसीचे आरक्षण कमी होणार नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेहमीच जनतेची दीशाभूल करत असतात. विकास कामावर चर्चा करण्यापेक्षा दोन समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम करतात.

gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट

हेही वाचा >>> खासदार नवनीत राणांची मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार; ‘कडक नोटा’ प्रकरणी…

महिलांच्या आरक्षणाबाबत काँग्रेसने कधीही प्रयत्न केले नाही. महिला आरक्षणाबाबत विधेयक मांडून नवा इतिहास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडविला. हे विधेयक मंजूर झाल्यावर देशातील निम्म्या संख्येत असलेल्या महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळेल व त्या देखील देशाच्या जडण-घडणीत हातभार लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सामाजिक एैक्याची व समाज प्रबोधनाची, राष्ट्रभक्तीची, गौरवशाली एतिहासिक परंपरा आहे. ही परंपरा पुढे नेताना नागरिकांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन गणेशोत्सव साजरा करावा असेही बावनकुळे म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-09-2023 at 16:56 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×