राजेश्वर ठाकरे

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत एका हॉटेलमध्ये बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीला उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे हे गैरहजर राहणार आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक मंगळवारी रात्री बोलावली. भाजपने तिसरा उमेदवार दिल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेला कसरत करावी लागत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची एकजूट दाखवण्यासाठी आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली. बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हजर आहेत. या बैठकीचे निमंत्रण आघाडीच्या सर्व आमदारांना देण्यात आले होते. परंतु नागपूर जिल्ह्यातील उमरेड मतदासंघाचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत.

CM Eknath Shinde On Mahavikas Aghadi
“विखे पाटलांची मुळं इतकी खोलवर आहेत, की मविआचं वरून कुणी आलं तरी…”, एकनाथ शिंदेंचा नगरमधून हल्लाबोल!
DCM Devendra Fadnavis On Congress
“मोदी हे महायुतीचं इंजिन, तर राहुल गांधींच्या ट्रेनचं…”; देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर निशाणा
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका
Leaders of India will have a power show tomorrow and organize a meeting at Ramlila ground in Delhi
‘इंडिया’च्या नेत्यांचे उद्या शक्तिप्रदर्शन, दिल्लीत रामलीला मैदानावर सभेचे आयोजन; विरोधकांच्या एकजुटीला बळ

 यासंदर्भात राजू पारवे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,  कुटुंबात लग्न सोहळा असल्याने ते बैठकीला हजर राहू शकत नसल्याचे पक्षश्रेष्ठींना कळवले आहे. मंगळवारी रात्रीउशीरा मुंबईला पोहचणार आहेत, असेही पारवे यांनी लोकसत्ताला सांगितले.